Coronavirus : घरात क्वारंटाईन असणार्‍यांना ‘शाई’ लावण्यास आरोग्य अधिकार्‍यांना निवडणूक आयोगाकडून परवानगी

नवी दिल्ली : वृत्त संस्था  – संपूर्ण देश कोरोना व्हायरसशी लढत आहे. यामुळे निवडणूक आयोगाने आज आपल्या निर्णयाचा आढावा घेतला आहे. आरोग्य अधिकाऱ्यांद्वारे घरात राहणाऱ्या व्यक्तींना वोटिंग दरम्यान लावल्या जाणाऱ्या शाईचा वापर करण्याची परवानगी देण्याचे ठरवले आहे.

निवडणूक आयोगाने जारी केलेल्या विधानात म्हटले आहे की, आरोग्य अधिकाऱ्यांना घरात क्वारंटाइनमध्ये राहणाऱ्या लोकांना चिन्हांकित करण्यासाठी शाईचा वापर करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला असून यासोबतच शाई लावण्याच्या काही अटीही आहेत. त्यात म्हटले आहे की, मंत्रालय त्या चिन्ह आणि ज्या ठिकाणी चिन्ह लावायचे आहे त्या जागेचे प्रमाणीकरण केले जाऊ शकते. अधिकाऱ्यांना त्या व्यक्तींचा रेकॉर्ड ठेवण्याचे आदेश दिले गेले आहेत ज्यांना शाई लावली गेली आहे.

कोरोनामुळे भारतात आतापर्यंत ९ लोकांचा मृत्यू
तामिळनाडूमध्ये आज कोरोना व्हायरसची पाच नवीन प्रकरणे आढळली असून त्यातील चार जण इंडोनेशियन नागरिक आणि चेन्नईमधून त्यांच्या गाइडची सलेम मेडिकल कॉलेजमध्ये चाचणी पॉजिटीव्ह आली असून ते २२ मार्चपासून क्वारंटाइन होते. आरोग्य मंत्रालयानुसार आज संपूर्ण देशात कोरोनाचे ५२६ रुग्ण आहेत. यात ५१९ लोकं भारतीय आहेत, तर ४३ लोकं परदेशातील असून या व्हायरसने ९ लोकांचा मृत्यू झाला आहे.