Coronavirus Impact : ‘कोरोना’मुळं अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचा भारत दौरा स्थगित, सैन्य अभ्यास मिलन – 2020 देखील टळला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसच्या धोक्यामुळे अमेरिकेचे संरक्षण मंत्री मार्क एस्पर यांचा 15 – 16 मार्चला होणार भारत दौरा रद्द करण्यात आला आहे. या यात्रेदरम्यान एस्पर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेणार होते. मनोहर पर्रिकर संरक्षण अध्ययन आणि विश्लेषण संस्था (आयडीएसए) द्वारे आयोजित दोन दिवसीय संम्मेलन स्थगित करण्यात आले आहे. जे गुरुवारी सुरु होणार होते.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शाह या संम्मेलनात भाग घेणार होते. यात अशियाच्या संरक्षण मुद्यांवर चर्चा होणार होती. यात भाग घेणाऱ्या चर्चाकर्त्यांना ई-मेल पाठवण्यात आले आहेत, ज्यात सांगण्यात आले आहे की कोविड – 19 संबंधित उत्पन्न झालेल्या जागतिक स्थितीच्या कारणाने 21 व्या अशिया सुरक्षा संम्मेलन स्थगित करण्यात आले आहे. संम्मेलनाची नवी तारीख योग्य वेळी कळवण्यात येईल.

आयडीएसए द्वारे आयोजित केलेल्या एका सम्मेलनात अमेरिका, रशिया, ऑस्ट्रेलिया, व्हिएतनाम, स्वीडन, बेल्जियम, जपान आणि ब्रिटन सारख्या देशात प्रतिभागी सहभागी झाले होते. विशाखापट्टनमध्ये नौदलाद्वारे 18 ते 28 मार्च पर्यंत आयोजित सर्वात मोठ्या बहुपक्षीय सराव मिलन – 2020 ला देखील खबरदारी म्हणून अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले आहे. याशिवाय भारत आणि इजिप्त मध्ये संयुक्त विशेष बल अभ्यास 2020 ला रद्द करण्यात आले आहे, जे 11 ते 13 मार्च दरम्यान जोधपूरमध्ये होणार होते.

उल्लेखनीय आहे की भारतात कोरोना व्हायरसचे संक्रमण वेगाने वाढत आहे. आरोग्य मंत्र्यांच्या मते, आज गुरुवारी हा आकडा 73 वर गेला आहे. बुधवारी कोरोना व्हायरसचे 60 प्रकरणं समोर आली. भारतात व्हायरस आणखी पसरु नये या कारणाने मोठी पावले उचलली जात आहेत. विदेशी नागरिकांवर 15 एप्रिलपर्यंत रोख लावण्यात आली आहे. भारतीय नागरिकांवर परदेशात जाण्यावर प्रतिबंध आणण्यात आलेले नाहीत परंतु सूचना देण्यात आल्या आहेत की विदेश प्रवास टाळा.