पावसाने झोपडले, भूकंपाने हादरले ‘पालघर’

पालघर : पोलीसनामा ऑनलाइन – एका बाजूला मुसळधार पावसाचा तडखा आणि त्याच वेळी मध्यरात्रीच्या सुमारास बसलेल्या भुकंपाने पालघरवासीय भयभित झाले आहेत. घरात रहावे तर भुकंपाचा धोका आणि बाहेर जोरदार पाऊस त्यामुळे नेमके काय करावे हे समजत नसल्याने ते हवालदील झाले आहे.

पालघर जिल्ह्यातील डहाणु, तलासरी भागात मध्य रात्री १ ते पहाटे ३ च्या दरम्यान सौम्य व मध्यम स्वरुपाचे भुकंपाचे धक्के बसले आहेत. रिश्टर स्केलवर ३.६ तीव्रतेचे दोन धक्के तर २.८ आणि २.९ तीव्रतेचे एक असे धक्के एका पाठोपाठ बसल्याने सर्व नागरिक दहशतीखाली आले आहेत. एकीकडे रात्रभर पाऊस पडत असताना दुसरीकडे भुकंपाचे धक्के बसत होते. त्यामुळे बाहेर जावे तर सर्वत्र पाणी साचलेले. त्यामुळे उघड्यावरही अथवा तंबूमध्ये रहिवासी थांबू शकत नव्हते तर घरात राहिले तर एका पाठोपाठ बसत असलेले धक्के यामुळे काय करावे हेच रहिवाश्यांना समजत नव्हते.

नोव्हेंबर २०१८ पासून या भागात भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. या वर्षी २०१९ मध्ये आतापर्यंत ३० ते ३५ वेळा भुकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत. पालघर जिल्ह्यात अनेक ठिकाणी कालपासून जोरदार पाऊस सुरु असून अनेक ठिकाणी नद्यांना पूर आले असून रस्ते पाण्याखाली गेले आहेत.