EPFO नं दिली सुविधा, नव्या नियमांमुळे लाखो खातेधारकांना नोकरीमध्ये होईल ‘हा’ फायदा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PF खातेधारकांसाठी आणि नोकरदार वर्गासाठी महत्वाची बातमी आहे. EPFO ने लाखो खातेधारकांसाठी एक नवीन योजना सुरु केली आहे. EPF च्या पोर्टलवर Date of exit चे नवीन फिचर जोडण्यात आले आहे. यामुळे आता खातेधारक आपली नोकरी बदल्यावर त्याबाबतची माहिती सहजपणे देऊ शकणार आहेत. आतापर्यंत खातेधारकांकडे याबाबतचे कोणतेही अधिकार नव्हते. यामुळे तत्यांना नोकरी सोडताना जुन्या कंपनीवर अवलंबून रहावे लागत होते. कारण EPF च्या सब्स्क्राइबरकडे ऑनलाइन सुविधा नव्हती.
EPFO पोर्टलवर Date Of Exit ला कशा प्रकारे अपडेट करणार
1) EPFO पोर्टलवर तुमचा UAN (Universal Account Number) पासवर्ड टाकून या ठिकाणी लॉगिन करा.
2) यानंतर ‘Manage’ सेक्शनमध्ये जा आणि येथील Mark Exit वर क्लीक करा. यानंतर select employment मध्ये तुम्हाला PF खाते क्रमांक निवडीचा पर्याय मिळेल.
3) याठिकाणी नोकरी सोडण्याच्या तारखेचा उल्लेख करा. यानंतर Request OTP पर्यायावर क्लीक करा. तुम्हाला आधार ला जॉईन असलेल्या मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी येईल त्यानंतर चेकबॉक्स सिलेक्ट करा आणि नंतर उपडेट वर क्लीक करून ओके म्हणा.
4) यानंतर तुम्हाला या आशयाचा मेसेज मिळेल, date of exit यशस्वीरीत्या अपडेट झाले. यानंतर तुम्ही व्हिव्ह आणि हिस्ट्री तपासल्यावर तुम्हाला सर्व माहिती मिळेल.
या गोष्टीची घ्या काळजी
हे लक्षात ठेवले पाहिजे की आपण कंपनी सोडण्यापूर्वी दोन महिने बाहेर पडण्याची तारीख निश्चित करू शकत नाही. पूर्वी, अनेक ईपीएफ खातेदारांनी तक्रार केली आहे की त्यांची मागील संस्था ईपीएफओमधून बाहेर पडण्याची तारीख जाहीर करण्यात मदत करत नाहीत.
यासाठी हे आहे महत्वाचे
नोकरी सोडण्याची तारीख मार्क करून निश्चित करणे खूप गरजेचे आहे. जर नोकरी बदलल्यानंतर आपली date of exit ची तारीख योग्यरित्या मार्क केली गेली नसेल तर, आपल्या जॉब रेकॉर्डमध्ये सातत्य असल्याचे मानले जाणार नाही आणि यामुळे आपल्याला या कालावधीसाठी मिळालेल्या व्याजावर कर भरण्यास सांगितले जाईल.
https://twitter.com/socialepfo/status/1219492521073528833
- ‘ब्लॅक कॉफी’ घेता ? वेळीच व्हा सावध ; रिसर्चमधील ‘हे’ 5 धक्कादायक खुलासे !
- सतत वजन कमी-जास्त होणे आरोग्यासाठी घातक ! जाणून घ्या 3 तथ्य
- थंडीत हृदयरोगाच्या रुग्णांनी ‘या’ 4 गोष्टींची घ्यावी खास काळजी !
- नारळ पाण्याने वेगाने वजन होईल कमी ! जाणून घ्या 11 फायदे
- ‘युरीनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन’ झाल्यास ‘या’ 5 गोष्टींची घ्या काळजी !