होम आयसोलेशनमध्ये राहणार्‍या संक्रमितांना एक्सपर्टचा सल्ला, कधीही करू नका ‘या’ चूका, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अनेक राज्यात कोरोना संक्रमितांना होम आयसोलेशनची परवानगी मिळाली आहे. कोरोना महामारीच्या या संकटात देशात दररोज हजारो नवीन रूग्ण आढळत आहेत. यापैकी काहींना हॉस्पिटलमध्ये भरती केले जात आहे, तर मोठ्या संख्येने लोकांना घरातच राहून चांगल्या प्रकारे देखरेख, खाणेपिणे आणि आयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला दिला जात आहे. अशात जर लोकांनी थोडी सावधगिरी बाळगली तर त्यांना जास्त त्रास होणार नाही.

असिम्टोमॅटिक संक्रमितांना होम आयसोलेशनचा सल्ला
डॉक्टर्सद्वारे ज्या संक्रमितांना होम आयसोलेशनमध्ये राहण्यास सांगितले जात आहे, त्यांच्यामध्ये बहुतांश असिम्टोमॅटिक (लक्षणे नसलेले) किंवा हलकी लक्षणे असणारे रूग्ण आहेत. संसर्गापासून वाचण्यासाठी अनेक लोकांनी ज्याप्रकारे कडक सुरक्षा उपायांचे पालन केले आहे, तशाच प्रकारे गरज भासल्यास स्वत:ला मोठ्या कालावधीसाठी आयसोलेशन म्हणून एका खोलीत बंद ठेवण्याची तयारी करणेसुद्धा कठीण आहे.

लक्षण दिसल्यास ताबडतोब व्हा होम आयसोलेट
नेफ्रो प्लसच्या क्लिनिकल अफेयर्सचे व्हाईस प्रेसीडन्ट आणि मूत्रपिंड विशेषज्ञ सुरेश शंकर यांनी म्हटले की, विनाकारण गळ्यात खवखव, डोकेदुखी, खोकला, कमजोरी, आणि ताप आल्यास कोरोनाची तपासणी करण्यापूर्वी जरूरी आहे की, तुम्ही घरात स्वताला आयसोलेट केले पाहिजे.

यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने तपासणी करण्यावर विचार करा. यापाठीमागे कारण हे आहे की, जर तुम्ही तपासणीत पॉझिटिव्ह आढळलात तर, स्वत:ला अगोदरच आयसोलेट करण्याने तुम्ही जवळपासच्या लोकांची संक्रमित होण्याची शक्यता कमी करू शकता. जर तुमचा रिपोर्ट निगेटिव्ह आला तर ही खुप चांगली गोष्ट आहे. तपासणीत हे लक्षात ठेवा की, कोणत्याही प्रकारे निगेटिव्ह असल्याचा चुकीचा रिपोर्ट मिळणार नाही.

जर तपासणी रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर तुम्हाला ज्या खोलीत आयसोलेट व्हायचे आहे, त्या खोलीतून ते सामान हटवा जे इतर लोकही वापरू शकतात. कारण आयसोलेशनच्या खोलीतील कोणतेही सामान बाहेर नेल्यास कुटुंबातील इतर सदस्यांना संसर्ग होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.