FASTag बनवण्यावर आता लागेल ‘एवढा’ चार्ज, 29 फेबु्रवारीपर्यंतच होती ‘सूट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ज्यांनी FASTags स्थापित केले नव्हते त्यांच्यासाठी २९ फेब्रुवारीपर्यंत कोणत्याही शुल्काशिवाय ती स्थापित करण्याची संधी होती. आता १०० रुपये आकारण्यात येणार आहेत. २९ फेब्रुवारीपर्यंत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) जारी केलेल्या FASTags वर १०० रुपये आकारण्यात येत नव्हते. ही सूट केंद्र सरकारने दिली होती, ज्याचा लाभ भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकृत मुद्द्यांमधून घेता येऊ शकत होता. शुल्कामध्ये सूट देण्यात आली होती. पूर्वीप्रमाणेच सुरक्षा डिपॉझिट व किमान शिल्लक रक्कम घेतली गेली. FASTag ला प्रोत्साहन देण्यासाठी या अगोदरच २२ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर २०१९ पर्यंत NHAI ने अशा पद्धतीची सूट दिली होती.

सरकार FASTags सिस्टमबद्दल उत्सुक होते. नोव्हेंबर २०१९ च्या तुलनेत डिसेंबर २०१९ मध्ये FASTags च्या माध्यमातून कलेक्शन दुपटीने वाढले आहे. म्हणजेच नोव्हेंबरमध्ये २३ कोटी रुपये मिळाले होते, ते डिसेंबरमध्ये ५० कोटींवर गेले. त्याचबरोबर १४ जानेवारी २०२० पर्यंत याचे दररोजचे कलेक्शन ३० लाख रुपयांवर गेले आहे.

NHAI ने सर्व टोल प्लाझावर FASTag काउंटर उघडले आहेत. याशिवाय आरटीओ, कॉमन सर्व्हिस सेंटर, ट्रान्सपोर्ट हब, पेट्रोल पंप व इतर ठिकाणीही ही व्यवस्था केली आहे. वाहन नोंदणी प्रमाणपत्र आणि कोणतेही ओळखपत्र दर्शवून कोणत्याही अधिकृत काउंटर किंवा केंद्रावर FASTag बनविला जाऊ शकतो. यासाठी NHAI ने विविध बँकांशी करार केला आहे. पूर्वीप्रमाणे FASTag बनवण्यासाठी आता १०० रुपये शुल्क आकारले जाईल.

अशा पद्धतीनं शोधा आपले जवळचे केंद्र
NHAI FASTag point-of-sale स्थान शोधण्याचे तीन मार्ग आहेत. MyFASTag अ‍ॅप्लिकेशनद्वारे ही माहिती मिळू शकते. या व्यतिरिक्त www.ihmcl.com वर किंवा ग्राहक सेवा क्रमांक १०३३ वर कॉल करून देखील माहिती मिळू शकते.