भारतीय महिला फेडरेशनची मागणी, म्हणाले – ‘कष्टकरी, कामगारांना कोरोनाची लस रेशनकार्डवर उपलब्ध करून द्या’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या वर्षभरापासून लॉकडाऊनमुळे असंघटित क्षेत्रातील महिला कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे देशातील सर्व कामगार, कष्टकरी नागरिकांना कोरोनाची लस ही रेशनकार्डावर उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी भारतीय महिला फेडरेशनने women demands केली आहे. रेशनवर लस दिल्याने त्याचा सर्वसामान्य नागरिकांना लाभ मिळेल, तसेच यासोबत डाळी, तेल, साखर, कडधान्य आदी रेशनवर देऊन कष्टकरी, कामगारांना दिलासा द्यावा अशी मागणी संघटनेने केली आहे.

कोल्हापूर, सांगली, सातारासह 10 जिल्ह्यांचा तिसर्‍या टप्प्यात समावेश, ‘या’ पध्दतीची असणार नियमावली, जाणून घ्या

भारतीय महिला फेडरेशनच्या 67 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सुनीता कुलकर्णी, निर्मला पवार, प्रभा राठोड, दीपा कदम, पुष्पा तापोळे आणि हर्षा पवार आदीनी ही मागणी केली.
तसेच यावेळी केंद्र सरकारच्या शेतकरी अन् कामगार विरोधी कायद्याचा निषेध करत हे कायदे रद्द करण्याची मागणी women demands संघटनेने केली आहे.

COVID-19 in India : कोरोनाचा वेग आणखी मंदावला; 24 तासात 1.20 लाख केस, 3380 रूग्णांचा मृत्यू

राज्यात घरकामगार महिलांची तातडीने नोंदणी सुरु करावी.
त्यांना दरमहा 10 हजार पेन्शन द्यावे,
राज्यातील सर्व मुलींना पदवीपर्य़तचे शिक्षण मोफत द्यावे,
महिलांना विधानसभेत अन् संसदेत 33 टक्के आरक्षण द्यावे,
आदी मागण्या देखील यावेळी करण्यात आल्या.
दरम्यान फेडरेशनची स्थापना 4 जून 1954 रोजी झाली होती.
या संघटनेत अहिल्या रांगणेकर, मृणाल गोरे, तारा रेड्डी, शांता रानडे आदींनी मोठे योगदान दिलेले आहे.
वर्धापनदिनानिमित्त मुंबई ठाण्यातील घरकामगार महिलांना रेशन किट वाटप करण्यात आले आहे.

READ ALSO THIS :

 

तुमचा रंग सावळा आहे का ? याचे आरोग्यदायी फायदे जाणून व्हाल थक्क !

 

मराठा आरक्षण रद्द होण्यामागे ‘हे’ दोन प्रमुख कायदेशीर मुद्दे; जाणून घ्या

 

दोन सख्ख्या बहिणींची गळफास घेऊन आत्महत्या, प्रचंड खळबळ

 

25 वर्षांच्या हलीमाने एकाचवेळी दिला होता 9 मुलांना जन्म; एक महिन्यानंतर ‘ही’ आहे स्थिती