Coronavirus : बदाम आणि दक्षिणी मिरचीचा वापर करून ‘व्हायरस’च्या संक्रमणाशी लढा, जाणून घ्या तज्ञांचं मत

अलिगढ : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसने माणसाच्या श्वसन नलिकेला त्रास होतोच पण सोबतच फुफ्फुसांनाही त्रास होतो. शरीराची अंतर्गत शक्ती कमजोर होते. माणसाची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असले तर तो या व्हायरसशी मजबुतीने लढू शकतो. युनानी वैद्यकीय पद्धतीत रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे प्रभावी उपाय आहेत. अलिगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीच्या तिबिया कॉलेजचे प्रा. नईम अहमद खान यांच्यानुसार, अंकुरित चणे, डाळ, बदाम आणि दक्षिणी मिरची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचा प्रभावी उपाय आहे. याचे सेवन खूप गरजेचे आहे. तसेच हंगामी फळे, प्रथिनेयुक्त पदार्थ आणि खजूराचे सेवन करा.

नाश्त्यात बदाम खा
अंकुरित चणे, डाळ आणि फळे माणसाला खूप ऊर्जा देतात.
दररोज नाश्त्यात पाच बदाम आणि ५-१० दक्षिणी मिरची खा.
हे दोन्हीही माणसाला दिवसभर रोगाशी लढण्याची शक्ती देतात.
बदाम एक प्रभावी अँटी-ऑक्सिडंट आहे, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.
दक्षिणी मिरची शरीरासाठी अँटी डोस सारखी काम करते. ती संक्रमणाला रोखते.

जेवणात काय घ्यावे
ब्रेडवर मध लावून खा.
खजूर धुऊन घ्या आणि आवळ्याच्या मुरंब्याचे सेवन करा.
सोयाबीन, हिरव्या भाज्या, लिंबू, डाळ आणि दही खा.
आहारावर जास्त खर्च होत असेल तर आवळ्याचा मुरंबा घ्या.
खजुरात लोहयुक्त पौष्टिक असतात, जे लाभदायक असतात.
जेवणात प्रोटीनयुक्त पदार्थ घेतले पाहिजे. पनीर मिळत असेल तर नक्की घ्या.

भारतात अधिक रोगप्रतिकारक शक्ती
प्रा. नईम यांचे म्हणणे आहे की, रोगप्रतिकारक शक्ती शहरी लोकांच्या तुलनेत ग्रामीण लोकांकडे जास्त असते. कोरोना व्हायरसचा परिणाम युरोप-अमेरिका सारखा भारतात नाहीये. हा रोगप्रतिकारक शक्तीचा परिणाम आहे. दुसऱ्या देशांच्या तुलनेत आपल्या देशातील लोकांकडे ही शक्ती जास्त आहे.

गरम पाणी प्या
माणसासाठी गरम पाणी रोगापासून वाचण्याचा सर्वात उत्तम पर्याय आहे. सतत गरम पाणी पीत राहा.

कापूर पाण्यात ठेवा
नवरात्रीत घरोघरी हवन केले जाते.
लोकांनी आपल्या घरात पाण्याने भरलेल्या भांड्यात कापूर ठेवावा.
कापूरामुळे पूर्ण वातावरण शुद्ध होते. आपण जो ऑक्सिजन घेऊ, तो पण शुद्ध असेल.
कोरोनाच्या संक्रमणापासून वाचण्यासाठी हात साबणाने धुवत राहा. लोकांना भेटू नका. घरातून तर अजिबात बाहेर पडू नका.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like