राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात मराठीचा ‘भोंगा’, हिंदीच्या ‘अंधाधुने’ मारली ‘बाजी’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – नुकतीच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली आहे. भोंगा हा मराठी चित्रपट सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे. शिवाजी लोटन हे या चित्रपटाचे डायरेक्टर आहे. याशिवाय अंधाधुन या सिनेमाने हिंदीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान मिळवला आहे. यात आयुष्मान खुराना आणि तब्बू प्रमुख भूमिकेत आहेत. याशिवाय जंगली पिक्चर्स निर्मित, बधाई हो, अंधाधुन, पद्मावत, राजी या चित्रपटांचाही राष्ट्रीय पुरस्कारात वरचष्मा पाहायला मिळाला. दिल्लीतील शास्त्री भवनात 66 व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.

याआधी या पुरस्कारांची घोषणा 24 एप्रिल रोजी केली जाणार होती. तर पुरस्कार वितरण सोहळा 3 मे रोजी पार पडणार होता. दरम्यान झालेल्या लोकसभा निवडणुकांमुळे या पुरस्कारांची घोषणा लाबणीवर गेली आहे. यानंतर आज या पुरस्कारांची घोषणा झाली आहे. त्याआधी पुरस्कार समितीने पुरस्कारांची
यादी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना दिली यानंतर या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.

मराठीचा डंका
नाळ चित्रपटातून आपल्या क्युटनेस आणि अभिनयाने सर्वांचे मन जिंकणाऱ्या श्रीनिवास पोकळेने राष्ट्रीय पुरस्कार पटकावला आहे. याशिवाय याच चित्रपटाचे दिग्दर्शक सुधाकर रेड्डी यांनाही पदार्पणासाठी पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय चुंबक चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता म्हणून स्वानंद किरकिरेला पुरस्कार मिळाला आहे.

आरोग्यविषयक वृत्त