PM CARES fund बाबत काँग्रेसच्या ‘त्या’ ट्विटवरून सोनिया गांधी यांच्यावर FIR

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या विरोधात कर्नाटकच्या शिवमोग्गा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 11 मे रोजी पीएमकेअर फंडाबाबत काँग्रेस पक्षाने केलेल्या ट्विटबद्दल एफआयआर दाखल करण्यात आला आहे. एफआयआरमध्ये सोनिया गांधी यांची ओळख सोशल मीडिया अकाऊंट हँडलर म्हणून करण्यात आली आहे. ही एफआयआर पंतप्रधान केअर फंडाबद्दल चुकीची माहिती देण्याच्या आरोपाखाली दाखल करण्यात आला आहे.

एका वृत्तसंस्थेच्या महणण्यानुसार, सोनिया गांधी यांच्या विरुद्ध भारतीय दंड संहिता (आयपीसी) कलम 133 (दंगा भडकवण्याच्या उद्देशाने भडकाऊ विधान करणे) आणि 505 (सार्वजनिक उपद्रवासाठी जबाबदार) अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

लोकांना सरकारविरुद्ध भडकवण्याचा प्रयत्न
अ‍ॅड. प्रवीण केव्ही यांनी दाखल केलेल्या तक्रारीत असा आरोप केला आहे की, काँग्रेस पक्षाने ट्विटरद्वारे भारत सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात भडकाऊ विधान केले आहे आणि सरकारविरुद्ध लोकांना भडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. एफआयआरनुसार काँग्रेस पक्षाने 11 मे 2020 रोजी खोटे आणि निराधर आरोप करत पंतप्रधान मोदींच्या निधीचा गैरवापर केल्याचा दावा करण्यात आला होता.

काँगेसने म्हटले PM CARES फसवणूक करणारे आहे – प्रवीण केवी
प्रवीण केव्ही यांनी गुरुवारी वृत्तसंस्थेला सांगितले की, 11 मे 2020 रोजी सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखालील अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या ट्विटर अकाउंटवर पंतप्रधान फंडाला फ्रॉड असल्याचे म्हटले आहे. तसेच पंतप्रधान केअर फंडातील रक्कम लोकांसाठी वापरली जात नसल्याचा दावा केला होता. प्रविण केव्ही म्हणाले की त्यांनी ट्विटर हँडलवरून ट्विट व अकाऊंटशी संबंधित सर्व माहिती गोळा करून याप्रकरणी तक्रार दिली आहे. यानंतर याची प्राथमिक चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर एफआयआर नोंदविण्यात आला.

निधीबद्दल अफवा पसरविण्याचा प्रयत्न – प्रवीण के.व्ही
प्रविण केव्ही म्हणाले, ट्विटरमध्ये असेही म्हटले होते की पंतप्रधान या निधितून परदेशी सहलीचा आनंद घेत आहे. या कोरोना विषाणूच्या परिस्थितीमध्ये भारत सरकार विरुद्ध अफवा पसरवली जात आहे. या प्रकरणात मी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी प्राथमिक चौकशीनंतर आयएनसी ट्विटर अकाउंटच्या प्रमुख सोनिया गांधी यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदविला आहे.