संयुक्त राष्ट्राच्या परिषदेत प्रथमच जलवायू परिवर्तनाबद्दल मंत्री प्रकाश जावडेकरांनी केला वैदिक मंत्रोच्चार

पोलिसनामा ऑनलाईन, नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळाच्या परिषदेत प्रथमच देववाणी संस्कृत श्लोक/मंत्रोच्चार करण्यात आला. केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी शुक्ल यजुर्वेदाच्या शांती पथ मंत्राने संस्कृतमध्ये आपले विचार मांडण्यास सुरूवात केली. या मंत्राद्वारे जगातील सर्व प्राणी, वनस्पती आणि निसर्ग शांतीसाठी प्रार्थना केली जाते. मंत्र खालीलप्रमाणे आहे.

हवामान बदलांविषयी यजुर्वेदाच्या श्लोकाचा उल्लेख आहे :
द्यौ: शांतिरंतरिक्षं शान्ति : पृथिवी शान्तिराप: शान्तिरोषधय : शान्ति:॥
वनस्पतय: शांतिविश्वे देवा: शांतिर्ब्रह्मा शांति: सर्वं शांति:, शांतिरेव शांति: सा मा शांतिरेधि ॥ 9 शांति: शांति: शांति:॥

केंद्रीय पर्यावरण मंत्री जावडेकर यांनी मंत्र स्वरुपाचे महत्त्व यावर टाकला प्रकाश :
मंत्रोच्चारनंतर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही या मंत्राच्या स्वरूपाचे महत्त्व सांगितले. ते म्हणाले की, अशी कोणतीही सार्वत्रिक पद्धत नाही ज्याद्वारे हवामान बदल आणि संघर्षाचे मूल्यांकन केले जाऊ शकते.

केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर पुढे म्हणाले की, सर्वच देशांनी हवामान बदलासाठी केलेल्या आश्वासनांची पूर्तता केली पाहिजे. 2020 पर्यंत सर्व देशांनी हवामान बदलांबाबत दिलेली आश्वासने पूर्ण करावीत.

केंद्रीय मंत्री म्हणाले की, जी -20 मध्ये भारत हा एकमेव देश आहे. ज्याने आपल्या हवामान बदलाच्या उद्दिष्टांची पूर्तता केली. त्यांनी केवळ लक्ष्य पूर्ण केलेच नाही तर त्यांनी पॅरिस कराराच्या पलीकडेही काम केले. सौर ऊर्जेच्या बाबतीत भारत सर्वात वेगाने विकसित होणारा देश आहे.