Free FASTag : आजपासून ‘फास्टॅग’ पुन्हा होणार ‘फ्री’, टोलवरील गर्दी आणि दंडापासून होणार ‘मुक्तता’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) पुन्हा एकदा चालकांना मोफत फास्टॅग देण्यास सुरवात केली आहे. टोल प्लाझा मुक्त करण्यासाठी आणि इलेक्ट्रॉनिक टोल संकलन वाढविण्यासाठी एनएचएआयने डिसेंबर 2019 मध्ये आपल्या सर्व टोल प्लाझावर फास्टॅग अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला. फास्टॅग अनिवार्य झाल्यानंतर टोल प्लाझा मोकळा होईल अशी अपेक्षा होती, परंतु समस्या तशीच आहे.

राष्ट्रीय महामार्गांच्या टोल प्लाझावर अजूनही वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसत आहेत. सर्व केंद्रांकडून असे अहवाल प्राप्त झाले आहेत की फास्टॅगबद्दल उदासीनता लहान वाहनचालक, विशेषत: कार चालकांमध्ये दिसून येत आहे. काही शहरांमध्ये, 50 टक्के कार मालकांनी फास्टॅग घेतलाच नाही. यामुळे टोल प्लाझाच्या फास्टॅग लेनमध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगादेखील दिसू शकतात.

डिसेंबर 2019 पासून फास्टॅग अनिवार्य –
यापूर्वी देखील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने 22 नोव्हेंबर 2019 ते 15 डिसेंबर 2019 दरम्यान चालकांना विनामूल्य फास्टॅग वाटप करण्याची मोहीम सुरू केली होती. एनएचएआय व्यतिरिक्त त्यावेळी सर्व बँका आणि ई-वॉलेट कंपन्यांकडून विनामूल्य फास्टॅग वाटप करण्याची मोहीम राबविली जात होती. त्यानंतर, 16 डिसेंबर 2019 पासून एनएचएआयच्या सर्व टोल प्लाझावर फास्टॅग अनिवार्य करण्यात आले.

दंडासह दुप्पट टोल वसूल करण्याची तरतूद –
जे फास्टॅगचा वापर करत नाहीत अशा वाहनचालकांकडून दंड वसूल करण्याचीही तरतूद करण्यात आली होती. त्यानंतर एनएचएआयने जाहीर केले होते की टोल प्लाझाचे बहुतेक लेन फास्टॅग असतील. अशा परिस्थितीत जर फास्टॅगविना वाहन त्या लेनमध्ये आले तर दंडासह दुप्पट कर आकारला जाईल. यानंतरही टोल प्लाझावर वाहनांच्या लांबच लांब रांगा एनएचएआयच्या चिंतेचे कारण बनल्या आहेत. एनएचएआयच्या चालकांनाही फास्टॅगच्या वापराविषयी सतत जागरूक केले जात आहे.

ब्रजभूमि एक्स्प्रेसवेचे प्रकल्प संचालक सूर्य प्रताप सिंह यांच्या म्हणण्यानुसार, सरकारने सर्व प्रयत्न करूनही केवळ 50 टक्के छोट्या वाहनांवर फास्टॅग लावण्यात आले आहे. दंड आकारण्याची भीती व दंड टाळण्यासाठी बड्या वाहन मालकांनी याचा वापर जवळपास 100 टक्के वापरण्यास सुरूवात केली आहे. छोट्या वाहन चालकांनी फास्टॅगमध्ये रस न घेतल्यामुळे टोल प्लाझावर जामची स्थिती कायम आहे.

फास्टॅग पुढील 15 दिवस विनामूल्य :
एनएचएआयने जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार वाहन चालक नोंदणी प्रमाणपत्र (आरसी) आणि फोटो ओळखपत्र घेऊन कोणत्याही ड्रायव्हरला त्वरित विनामूल्य फास्टॅग मिळू शकेल. पुढील 15 दिवस एनएचएआयच्या सर्व टोल प्लाझावर विनामूल्य फास्टॅग उपलब्ध असेल. एनएचएआयने 15 फेब्रुवारी 2020 ते 29 फेब्रुवारी 2020 पर्यंत विनामूल्य फास्टॅगचे वितरण करण्याची घोषणा केली आहे. यावेळी वाहन चालकांना 100 रुपये शुल्क द्यावे लागणार नाही. वाहनचालकांना प्लाझावर टोल भरायला लागणार नाही. वाहन चालक न थांबता आपोआप टोल टॅक्स भरण्यास सक्षम असतील. यामुळे टोल प्लाझावरील जामपासून वाहनचालकांना दिलासा मिळणार आहे.