ISRO चे ‘शुक्र मिशन’ 2025 मध्ये, फ्रान्सचा देखील समावेश, अंतराळ संस्था CNES नं दिली माहिती

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : फ्रान्सची अंतराळ संस्था सीएनईएसने बुधवारी सांगितले की, भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) 2025 मध्ये शुक्र ग्रहाशी संबंधित आपले अभियान राबवेल आणि फ्रान्सचा यात सहभाग असेल. सीएनईएसने एका निवेदनात म्हटले आहे की, इस्रोने विनंती प्रस्तावानंतर मिशनसाठी रशियन अवकाश एजन्सी ‘रॉस्कॉस्मस’ आणि फ्रेंच राष्ट्रीय वैज्ञानिक संशोधन केंद्र सीएनआरएसशी संबंधित फ्रांसीसी संशोधन प्रयोगशाळा ‘लॅटमॉस’ द्वारे संयुक्तपणे विकसित केलेल्या ‘व्हायरल’ (व्हिनस इन्फ्रारेड अटमॉस्फेरिक गॅसेस लिंक) उपकरणाची निवड केली आहे.

इस्रोचे अध्यक्ष के. सिवन आणि सीएनईएसचे अध्यक्ष जीन यवेस ले. गाल यांनी एकमेकांसोबत चर्चा केली आणि अंतराळात भारत आणि फ्रान्समधील सहकार्याच्या क्षेत्रांचा आढावा घेतला. सीएनईएसने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की अंतरिक्ष शोध क्षेत्रात शुक्र ग्रहाशी संबंधित इस्रोच्या मोहिमेमध्ये फ्रान्स सामील होईल, ज्याचे 2025 मध्ये प्रक्षेपण होईल. सीएनईएस फ्रेंच योगदानाची तयारी आणि समन्वय साधेल. पहिल्यांदाच भारताच्या शोध मोहिमेमध्ये फ्रेंच उपकरणे वापरली जातील. मात्र, याबाबत इस्रोकडून कोणतेही निवेदन अद्याप देण्यात आलेले नाही.

विशेष म्हणजे शुक्राच्या वातावरणामध्ये कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाण जास्त आहे. एका अंदाजानुसार ते 96 टक्के पर्यंत असू शकते. इतकेच नाही तर शुक्रावरील वातावरणाचा दाब पृथ्वीच्या तुलनेत 90 पटीने जास्त असेल असा अंदाज आहे. शुक्र आकाराच्या बाबतीत बऱ्यापैकी पृथ्वीच्या समान आहे. तथापि, सूर्य जवळ असल्यामुळे त्याचे तापमान पृथ्वीपेक्षा अधिक आहे. चंद्रानंतर आकाशात सर्वाधिक प्रकाशणारा हा ग्रह आहे.

अलीकडेच केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले होते की पुढच्या वर्षाच्या सुरूवातीस भारताचे चंद्रयान-3 रवाना होऊ शकते. केंद्रीय मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार चंद्रयान-3 मध्ये ऑर्बिटर नसणार, फक्त लँडर आणि रोव्हरच त्याचा भाग असतील. हे चंद्रयान-2 च्या पुनरावृत्ती मिशनसारखे असेल. चंद्रयान-2 च्या क्रॅश लँडिंगनंतर इस्रोने चंद्रयान-3 या वर्षाच्या अखेरीस पाठविण्याची योजना आखली होती परंतु कोरोना संकटामुळे त्यात उशीर होत आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like