एक्सप्रेसवेवरील दुर्घटना टाळण्यासाठी टायरमध्ये सिलिकॉन-नायट्रोजन असणे होणार बंधनकारक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकार महामार्गावर सतत वाढणारे अपघात थांबविण्यासाठी वाहनांच्या टायर्समध्ये सिलिकॉनचा वापर करून सामान्य हवा भरण्याऐवजी वाहनाच्या टायर्समध्ये नायट्रोजन हवा भरण्याचा विचार करीत आहोत. यमुना एक्सप्रेसवेवर झालेल्या अपघाता विषयी प्रश्नांची उत्तरे देताना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

लखनौ वरून दिल्लीला येत असलेल्या एका बसचा यमुना एक्सप्रेसवर अपघात होऊन अनेकांना आपले जीव गमवावे लागले. यावर गडकरी यांनी या घटनेविषयी दुःख व्यक्त केले. एक्सप्रेस हायवेवर वाढत असलेल्या दुर्घटना पाहून, तंत्रज्ञानातील अनेक सुधारणा आवश्यक आहेत. यमुना एक्सप्रेस उत्तर प्रदेश सरकारद्वारे तयार करण्यात आला आहे, जो नोएडा प्राधिकरणाद्वारे संचालित आहे. केंद्र सरकारचा यामध्ये काहीही संबंध नाही. तरी, सोमवारी सकाळी झालेल्या घटनेनंतर, प्राधिकरणाच्या लोकांशी चर्चा केली आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी या घटनेची चौकशी करण्यासाठी समिती तयार केली आहे.

गडकरी म्हणाले की गेल्या तीन वर्षांत यमुना एक्सप्रेसवेमध्ये झालेल्या अपघातांची संख्या हा चिंतेचा विषय आहे. २०१६ मध्ये १५०० हून अधिक अपघात झाले ज्यामध्ये १३३ लोक मृत्युमुखी पडले. २०१७ मध्ये १४६ लोक अपघातात ठार झाले होते तर २०१८ मध्ये १११ लोक ठार झाले होते.

रस्तेवाहतूक मंत्रांनी सांगितले की यमुना एक्सप्रेस वे हा सिमेंट-काॅंक्रीटपासून बनविलेला आहे. अशा परिस्थितीत वेगाने धावण्यामुळे वाहनांची चाके गरम होऊन फुटतात. म्हणून रबर असलेल्या सिलिकॉनचा वापर टायर्सच्या उत्पादनासाठी अनिवार्य करणे आवश्यक आहे. जेणेकरुन टायर थंड ठेवता येईल. त्याचप्रमाणे, सामान्य हवा भरण्याऐवजी आम्ही टायरमध्ये नायट्रोजन हवा अनिवार्य करण्याचा विचार करीत आहोत.

पूरक प्रश्नांची उत्तरे देत एसपीचे रामगोपाल यादव यांनी गडकरी यांना सांगितले की यमुना एक्सप्रेसवेवरील अपघात हे, वेगाने वाहन चालवने , दारू पिऊन वाहन चालवने आणि वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवणे या कारणांनीच अपघात घडतात. म्हणूनच ही जबाबदारी राज्यांवर टाकून जमणार नाही. यावर गडकरी म्हणाले की आम्ही महामार्गांवर अपघाती ठिकाणे आधीच ओळखली आहेत आणि यावर १४ हजार कोटी रुपये खर्च करून सुधारणा केल्या आहेत.

त्यांनी सांगितले की रस्ते दुर्घटना थांबविण्यासाठी राज्यांनाही पुढाकार घेणे आवश्यक आहे आणि या प्रकरणात तमिळनाडूच्या उदाहरणातून दुसरे राज्य शिकू शकेल. गडकरी म्हणाले, रस्ते अपघातांच्या बाबतीत उत्तर प्रदेश हा क्रमांक एक आहे तर तमिळनाडु हे थांबविण्यासाठी या पुढाकाराच्या आघाडीवर आहे. तमिळनाडुमधील पुढाकाराने, रस्ते अपघातांमध्ये २९% घट झाली आहे.

केंद्रीय मंत्र्यांनी खासदारांना सांगितले की म्हणूनच त्यांनी गेल्यावर्षी मोटार वाहन दुरुस्ती विधेयक पार करण्याचा प्रयत्न केला आणि आता ते पास केले पाहिजे. त्यांनी सांगितले की देशातील सर्व ड्रायव्हिंग परवान्यांपैकी ३०% बनावट आहेत. दुर्घटना टाळण्यासाठी वेग कमी करण्याच्या प्रश्नावर गडकरी यांनी सांगितले की वेग कमी करण्याची मर्यादा हे समाधान नाही परंतु त्याऐवजी तांत्रिक सुधारणा करून दुर्घटना कमी करणे आवश्यक आहे.

असे ठेवा ‘मेंदू’वर नियंत्रण, जाणून घ्या ‘हे’ सोपे उपाय

आंब्याची पानेही आरोग्यासाठी आहेत ‘फायदेशीर’

पावसाळ्यात खा भरपूर ‘जीवनसत्व’ असलेला आरोग्यदायी ‘राजमा’

स्तनाचा कॅन्सर, डायबेटीजचा धोका कमी करण्यासाठी ‘हे’ सेवन करा

रोग प्रतिकारशक्तीवर परिणामकारक ठरतात ‘या’ गोष्टी