National Games 2022 | महाराष्ट्राच्या राधिका आवटीला तलवारबाजीत मिळाले सुवर्णपदक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – National Games 2022 | गुजरात (Gujrat) येथील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या राधिका आवटीला (Radhik Aawti) तलवारबाजीत (Fencing) सुवर्णपदक मिळाले आहे. याअगोदर रुद्रपूर येथे झालेल्या ३१ व्या वरिष्ठ राष्ट्रीय तलवारबाजी अजिंक्‍यपद स्पर्धेत (Senior National Fencing Championship) फॉइल प्रकारात राधिका आवटीने सुवर्णपदक मिळवल्यामुळे कतार (दोहा) येथील फॉइल ग्रँड प्रीक्‍स स्पर्धेसाठी तसेच ऑलिम्पिक (Olympics) पात्रता फेरीसाठी तिची निवड झाली होती. हे तिचे सलग चौथे सुवर्णपदक आहे. (National Games 2022)

 

मूळची महाराष्ट्रातील सांगली (Sangli) जिल्ह्यतील राधिका प्रकाश आवटी हिने गुजरातमध्ये गांधीनगर येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत केरळकडून (Keral) खेळताना तलवारबाजीत सुवर्णपदकाची कमाई केली आहे. तिचे हे सुवर्णपदक राष्ट्रीय स्पर्धेतील सलग चौथे सुवर्णपदक ठरले आहे. सांगली जिल्ह्यतील शिरोळ तालुक्यातील अकिवाट हे राधिकाचे मूळ गाव आहे.

 

राधिकाचे प्राथमिक शिक्षण कुपवाडमधील नवकृष्णा व्हॅली येथे झाले आहे. सध्या ती केरळ येथे ‘साई’ प्रशिक्षण केंद्रात सराव करीत आहे. कसून केलेल्या सरावाच्या जोरावर तिने तलवारबाजी स्पर्धेत मोठी मजल मारत 2020 साली वरिष्ठ राष्ट्रीय तलवारबाजी अजिंक्‍यपद स्पर्धेत तिने सुवर्णपदक पटकावले होते. यामुळे तिची ऑलिम्पिक पात्रता फेरीसाठी निवड झाली होती. या खेळात महाराष्ट्रातून राधिका आवटीने गेल्या दोन वर्षात चमकदार कामगिरी करत स्वतःला सिद्ध केले. (National Games 2022)

देशभरात तलवारबाजीचे प्रशिक्षण देणाऱ्या मोजक्याच काही संस्था आहेत. यामध्ये थॅलेसरच्या केंद्राचा समावेश होतो.
या केंद्राची माहिती मिळाल्यानंतर राधिका आपल्या वडिलांसह या केंद्राच्या निवड चाचणीसाठी गेली.
तिची निवड झाल्यानंतर तिने तेथेच राहण्याचा निर्णय घेतला. यानंतर तिने कधीच मागे वळून बघितले नाही.
काही वर्षांपूर्वी, तिने सिंगापूरमधील (Singapore) अंडर-17 आशियाई चॅम्पियनशिपमध्ये (Under-17 Asian Championship) भाग घेत आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते.
तेव्हापासून राधिका राष्ट्रीय स्पर्धांमधून कधी रिकाम्या हाताने परतली नाही. कोणते ना कोणते मेडल ती जिंकून यायची.

 

Web Title :- National Games 2022 | national games 2022 maharashtras radhika awati wins gold medal in fencing at national games

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ajit Pawar | आई-वडिलांना शिव्या देण्याच्या वक्तव्यावरून अजित पवारांनी घेतला चंद्रकांत पाटलांचा समाचार

Pune Crime | दुभाजकाला धडकून १७ वर्षाच्या मुलाचा मृत्यु; बाणेर परीसरातील घटना

Rain in Maharashtra | उद्या पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांना ‘येलो’ अलर्ट, 11 ऑक्टोबर पर्यंत राज्यात पावसाचा हाहाकार

Mohan Bhagwat | मोहन भागवतांच्या वक्तव्यावर ब्राह्मण महासंघाचा संताप, तुम्ही देशात जातीयवाद वाढवताय, इथला हिंदू नराधमांच्या…