‘त्या’ मुली म्हणतात – ‘बुद्धी, ‘विचार’, आणि ‘प्रतिभा’ याचा रंगाशी काहीही संबंध नाही, तुम्ही फक्त आमचं ‘धैर्य’ पहा’ !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   व्यक्तिमत्व बनतं ते म्हणजे आपल्या क्षमतेनं आणि प्रतिभेनं. परंतु याची पारख केली जाते ती म्हणजे त्वचेच्या रंगावरून. ही काळी आहे, सावळी आहे, माहित नाही हिचा रंग कोणावर गेलाय असे टोमणे ऐकत काही मुली जगतात मोठ्या होतात. असं असलं तरी त्या मुली ज्या दिसायला गोऱ्या नसतात आपला मार्गही बनवतात. काळ्या मुलीला अमावस्येची रात्र म्हटलं जात तर गोऱ्या मुलीला चंद्राचा तुकडा.

अनेकदा थेट मनावर घाव घालणाऱ्या काही वाक्यामुळं त्यांचा आत्मविश्वास डगमगतो. त्यांना हीनभावना वाटू लागते. परंतु अधिकाधिक मुली याची पर्वा न करत पुढे निघून जातात. त्या यशही मिळवतात आणि समाजाला सांगतात, रंग नाही आमचं धैर्य पहा.

अभिनेत्री बिपाशा बसुनं इस्टावरून एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिनं सावळ्या रंगाबद्दल तिचे लहानपणापासून तर आतापर्यंतचे अनुभव सांगितले आहेत. ती सागंते जेव्हा मी सुपरमॉडेलचा किताब जिंकले तेव्हा वर्तमानपत्रांनी लिहिलं होतं की, कोलकात्याच्या एका सावळ्या मुलीनं किताब जिकंला आहे. सर्वात आधी माझा सावळा रंग पाहिला गेल्यानं मी चकित झाले. नेहमीच माझा कलर हे पहिलं विशेषण राहिलं आहे. परंतु मला जे काही करायचं होतं ते करण्यापासून हे मला कधीच अडवू शकलं नाही.

बिपाशा बसु्प्रमाणेच अनेक अभिनेत्री आणि सामान्य मुलींनी आपल्या स्किन कलरबद्दल अनुभवलेले अनुभव सांगितले आहेत. काय समाजात आजही एका प्रतिभावान मुलीला तिच्या रंगाच्या आधारावर पाहिलं जातं ? काय त्यांना वर्णभेदाचा सामना प्रत्येक ठिकाणी करावा लागतो ? हा प्रश्न तेव्हा तर आणखी प्रासंगिक होतो जेव्हा पूर्ण दुनियेत वर्णभेदाचा मुद्दा उचलून धरला जात आहे आणि फेअर अँड लव्हलीनं आपल्या ब्रँडमधून फेअर शब्द हटवण्याची घोषणा केली आहे.

लहानपणापासून केवळ टोमणे

जेव्हा लहानपणापासूनच असं ऐकायला लागतं की, अरे ही मुलगी तर काळी आहे, जरा विचार करा तिच्या बालमनावर काय परिणाम होत असेल. त्या लहानग्या मुलीला हेही कळत नाही की, यात तिचा दोष काय आहे. परंतु आपल्या समाजातही असे प्रकार कमी झालेले नाहीत. लोकांनी हे बोलण्याची संधी कधीच सोडली नाही की, हिचा रंग थोडा डार्क आहे.

सॉफ्टवेअर इंजिनिअर, लेखक, वैदिक वाटिका प्रा. लि. ची डायरेक्टर अंकिता जैन म्हणते, माझ्या जन्मानंतर माझी आई पहिल्यांदाच मला एका नातेवाईकाकडे घेऊन गेली. तर त्यांनी म्हटलं की, ही कोणाची मुलगी उचलून आणलीय कोळशासारखी.

याचं कारण हे होतं की, माझ्या आईवडिलांचा रंग उजळ होता. नंतर बहिण झाली तिचा रंगही उजळ होता. माझे काही कजन्स आजही मला कल्लो नावानं चिडवतात. त्यांनी लहानपणापासून जे काही केलं त्यामुळं मला असंच वाटू लागलं की, गोरं असणं म्हणजेच सुंदर असणं आहे. मला वाटायचं की मी कुरूप आहे आणि माझी बहिण आणि कजन्स रूपवान आहेत. चांगली बाब अशीय की, माझ्या आईनं मला असं कधीच जाणवू दिलं नाही.

आज मला कळत आहे की, आईनं कधीच असा काही फरक केला नाही. परंतु समाज एखाद्या मुलीला आईच्या नजरेनं कुठं पहात असतो. मी कितीही तयार झाले, सजले सवरले तरीही आत्मविश्वास वाटत नव्हता की, मी चांगली दिसत आहे.

जशी मी मोठी होत गेले तशी शिक्षण आणि प्रतिभेनं मी उत्तम आहे असं सिद्ध करण्याची इच्छा ठेवू लागले. बहुतेक माझ्याप्रमाणे इतर अनेक मुली असं करत असतील ज्यांना त्यांच्या रंगामुळं वारंवार दया दाखवली जाते, कमी लेखलं जातं किंवा एका वेगळ्या वर्गातलं समजलं जातं.

खोटी प्रसिद्धी

सावळी सून कोणालाच नको असते. जाहिरातही आली तरी त्यात गोरी, सुंदर, घरकामात अव्वल अशी मुलगी हवी असल्याचं दाखवलं जातं. नोकरीसाठीही गोरी, उंच, आकर्षक अशी विशेषणं वापरली जातात. म्हणजे फक्त बाहेरली सौंदर्यचं प्रभाव पाडतं का ? महिलांसोबतच हा वर्णभेद शुतकांपासून चालत आला आहे. आपल्या बंडखोर वृत्तीसोबत लेखिका नीलिमा चौहान म्हणतात, आपला भूतकाळ आधी सामंती होता. नंतर वसाहतीवादी, परंतु आता एकविसाव्या शतकात प्रत्येक क्षेत्रात प्रगती असूनही आपण एका खोट्या प्रसिद्धीला छातीशी कवटाळून उभे आहोत

इंडस्ट्री गडद रंगामुळं डगमगते

फिल्म इंडस्ट्री तर केवळ शो बिजनेस आहे. इथं सावळ्या अभिनेत्रींचा मार्ग तर अजूनही कठिण राहिला आहे. अभिनेत्री राधिका आपटेलाही आपल्या सावळ्या रंगामुळं इंडस्ट्रीत अनेक लोकांचे टोमणे ऐकावे लागले आहेत. अनेकांनी तर असंही म्हटलं की, ती इंडस्ट्रीच्या लायक नाही. ती कधीच अभिनेत्री बनू शकत नाही. परंतु राधिकानं याची पर्वा केली नाही. तिनं आपल्या कामातून निंदकांना उत्तर दिलं.

डायरेक्टर आणि अभिनेत्री नंदिता दास हिनंही अनेकदा हा मुद्दा उचलून धरला आहे. नंदिता दासनं 2009 मध्ये डार्क इज ब्युटीफुली नावाचं अभियान सुरू केलं होतं. कंगना रणौतनंही सांगितलं होतं की, फिल्म इंडस्ट्री गडद रंगाच्या अॅक्टरला कास्ट करताना डगमगते. कंगनानं कधीच कोणतं फेअरनेस प्रॉडक्ट एंडोर्स केलं नाही. एकदा ती म्हणाली होती की, माझी बहिण (रंगोली चंदेल) सावळी आहे. तरीही ती सुंदर आहे. मी जर असं केलं तर तिचा अपमान केल्यासारखं आहे.

अंकिता जैन (सॉफ्टवेअर इंजिनियर, रायटर) म्हणते, मला सांगितलं जात होतं की, पिवळा हिरवा, जांभळा कलर घालून नकोस अजून काळी वाटते. गोऱ्या मुलींना हा रंग छान दिसतो. जेव्हा लग्नाचे प्रस्ताव आले तेव्हा अनेक उच्च शिक्षित मुलांनीही रंगामुळं मला रिजेक्ट केलं. एका मुलानं तर भेटल्यानंतर असं म्हटलं होतं की, मी गुलाबी विचार करून आलो होतो, तू जांभळी निघालीस.

आता मी असा विचार करते माझ्यासोबत घडलेली ती चांगली घटना होती. कारण जरी त्यांनी मला स्विकारलं असतं तर तेही कमी लेखत. जसं काही तडजोड करत आहेत. मी आज अशा व्यक्तीसोबत आहे ज्याच्या नजरेत सौंदर्य गुणात आहे रंगात नाही. लग्नानंतर काही वडिलधाऱ्या महिलांनी पाहिलं तेव्हा म्हटल्या होत्या की, सुंदर आहे परंतु थोडा डार्क रंग आहे. समाजात आजही नवीन सुनेला पाहायला जाणाऱ्या काही महिला रंगावरून टिप्पणी करतात.

मला हे समजायला लागलं आहे की, रंग रुपानं काही फरक पडत नाही. परंतु क्रिम बनवणाऱ्या अनेक कंपन्यांनी समाजातील या वर्णभेदावर आपला व्यापार उभा केला. त्यांनी याच बेसवर सावळ्या मुलींना आमीष दाखवलं की, त्या गोरं होऊ शकतात. चकित करणारी बाब अशीय की, ते या क्रिमला अशा प्रकारे सादर करत होते की, मुलीमध्ये पूर्ण आत्मविश्वास हा केवळ तिच्या रंगामुळंच असतो. तिच्या गुण दोषानं काहीच फरक पडत नाही.

नीलिमा चौहान (लेखक, असोसिएट प्रोफेसर दिल्ली विद्यापीठ) म्हणतात, सावळ्या मुलीच्या यशाची स्टोरी एकवत आपण गोऱ्या त्वचेला आदर्श आणि सावळेपमाला एका कमतरतेच्या रूपात सादर करतो हे देखील एक विडंबन किंवा उपरोधच आहे. आपल्या चर्चेची ही शैली बदलायला हवी. सावळ्या मुलींच्या यशाच्या कथा ऐकवणं साफ चुकीचं आहे.

बुद्धी, विचार आणि प्रतिभा यांचा रंगाशी कसलाही संबंध नाही. गोरा रंग म्हणजे कोणतीही शिडी, अतिरीक्त योग्यता किंवा गुणवत्ता नाही. हा मुलींसाठी शाप आहे. गोऱ्या रंगालाच प्रमुख आकर्षण समजणाऱ्या मुली यातच अडकतील आणि कधीच वर येऊ शकणार नाहीत.

अभिनेत्री टीना भाटिया सांगते की, आम्ही चार भाऊ बहिण आहोत. माझी मोठी बहिण, भैय्या, आणि लहान बहिण आईवर आहेत आणि मी पप्पांवर. ते गोरे आहेत. माझ्या मनात कायम हा कॉम्पलेक्स राहिलाय की, मम्मीसारखी का नाहीये. देशात भलेही याला वर्णभेदाचं नाव द्या किंवा नका देऊ परंतु हे होत असतं एवढं मात्र नक्की आहे. मी पप्पांवर गेले आहे तर लकी आहे हाच विचार करून मी खुश होत असते. विशेष म्हणजे गुलाबो सिताबोमध्ये मी अमिताभ बच्चनसोबत काम करण्याचं स्वप्नही पूर्ण करू शकले आहे.

अभिनेत्री नंदिता दास म्हणते, लोक मला विचारतात की, डार्क स्किन असूनही तुझ्यात एवढा आत्मविश्वास कसा आहे. यातूनच कळतं की, त्वचेचा रंग आणि आत्मविश्वास यांना परस्परांशी कशा प्रकारे जोडलं गेलं आहे.

अभिनेत्री राधिका आपटे म्हणते, मला माझ्या सावळ्या रंगाचा अभिमान आहे. तुमच्यात जी काही कमतरता आहे मग तो रंग असो किंवा लुक, तो तुमचा युनिकनेस आहे.

अभिनेत्री बिपाशा बसु म्हणते, “जेव्हा मी मोठी होत होते तेव्हा हेच ऐकत मोठी झाले की, बोनी सोनीपेक्षा जास्त सावळी आहे, ती खूप सावळी आणि काळी आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like