राज्यात एकही कोरोना रूग्ण नसल्याचा ‘या’ मुख्यमंत्र्यांनी केला दावा, 3 मे पर्यंत सहकार्याचं नागरिकांना केलं आवाहन (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  –   देशभरात कोरोना विषाणूचा थैमान सुरूच आहे, रुग्णांच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्याच वेळी एक आनंदाची बातमी समोर आली असून देशातील एक राज्य कोरोनमुक्त झाले आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दावा केला आहे की, राज्यात एकही कोरोना रुग्ण नाही. त्यांनी लोकांना सांगितले की, तुम्ही सर्वांनी ज्या पद्धतीने आजपर्यंत प्रशासनाला पाठिंबा दर्शविला, तोच 3 मे पर्यंत दर्शवा. कोविड -19 मध्ये लढा देणाऱ्या सर्व वैद्यकीय कर्मचार्‍यांचे मुख्यमंत्र्यांनी आभार मानले, ज्यांनी सर्व सात रुग्णांवर उपचार केले. यापैकी सहा रुग्ण परदेशी असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, देशात कोरोना संक्रमितांचा आकडा 14 हजाराच्या वर गेला असून, 519 जणांचा मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे 2,302 लोक या आजारातून बरे झाले आहेत