…तर तुमच्या ब्राउजिंगवर लक्ष ठेऊ शकणार नाही कंपनी – Google

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गुगलने बुधवारी म्हटले की, एकदा तुम्ही सिस्टममधून थर्ड पार्टी कुकीज नष्ट केल्यानंतर ते लोकांच्या इंटरनेट ब्राउजिंगवर लक्ष देणे सोडून देतील. कंपनीने म्हटले की, त्यांच्यासाठी लोकांच्या वैयक्तिक सुरक्षिततेला सर्वाच्च प्राधान्य आहे. ते क्रोमवर ब्राउजिंग करणार्‍या व्यक्तींच्या ओळखीसाठी कोणतेही पर्यायी तंत्रज्ञान विकसित करणार नाही.

मागील वर्षी जानेवारीमध्ये कंपनीने घोषणा केली होती की, ते पुढील दोन वर्षात टप्प्याटप्प्याने आपले ब्राउजर क्रोमला थर्ड पार्टी कुकीजपासून मुक्त करतील. थर्ड पार्टी कुकीज छोटे-छोटे कोड असतात, ज्यांचा वापर वेबसाइटचे जाहीरातदार यूजरच्या व्यक्तिगत ब्राउजिंगला रेकॉर्ड करण्यासाठी करतात. या आधारावर व्यक्तीच्या आवडीचा शोध घेतला जातो आणि त्यानुसार त्यांना ऑनलाइन जाहिरातील पाठवल्या जातात.

एका ब्लॉगपोस्टमध्ये गुगलने म्हटले की, व्यक्तिगत यूजरच्या डाटाचा हजारो कंपन्यांमध्ये प्रसार झाला आहे, सामान्यपणे यास थर्ड पार्टी कुकीजद्वारे एकत्र केले जाते आणि यामुळे लोकांचा विश्वास कमी झाला आहे.

गुगलने पेव्ह रिसर्च सेंटरच्या डाटाचा संदर्भ दिला आहे, ज्यानुसार बहुतांश लोक मानतात की, ते जे काही ऑनलाइन करतात, त्यावर जाहिरातदार, तंत्रज्ञान कंपनी किंवा इतर तंत्रज्ञान कंपन्या लक्ष ठेवतात. बहुतांश लोकांचे हे सुद्धा म्हणणे आहे की, डाटा एकत्र करण्याने त्यांना संभाव्य जोखिम असते.

गुगलने म्हटले की, जर डिजिटल जाहिराती आणि व्यक्तिगत डाटाच्या उपयोगाबाबत लोकांची वाढती चिंता दूर केली नाही तर आपण मोफत वेबचे भविष्य धोक्यात टाकत आहोत. कंपनीने म्हटले की, यासाठी त्यांनीम मागच्या वर्षी थर्ड पार्टी कुकीज हटवण्याची घोषणा केली होती.