Govt COVID Treatment Guidelines : कोरोना संक्रमित रूग्णांसाठी सरकारची नवी मार्गदर्शक तत्त्वे, होम आयसोलेशनपासून औषधापर्यंत; जाणून घ्या सर्वकाही

नवी दिल्ली : वृत्त संस्था – केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने होम आयसोलेशनमध्ये राहणार्‍या हलका संसर्ग किंवा लक्षणे नसलेल्या रूग्णांसाठी सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यामध्ये म्हटले आहे की, होम आयसोलेशनमध्ये 10 दिवसांपर्यंत राहणे आणि लागोपाठ तीन दिवस ताप न आल्याच्या स्थितीत रूग्ण होम आयसोलेशनच्या बाहेर येऊ शकतात आणि त्यावेळी टेस्टिंगची आवश्यकता नाही.

मार्गदर्शक तत्त्वांनुसार आरोग्य अधिकार्‍याने रूग्णाच्या स्थितीला हलकी किंवा लक्षणे नसलेली केस ठरवले पाहिजे. अशा प्रकरणात रूग्णाच्या सेल्फ आयसोलेशनची त्याच्या घरातच व्यवस्था झाली पाहिजे. असे रूग्ण ज्या खोलीत राहतात त्याचे ऑक्सीजन सॅच्युरेशन सुद्धा 94 टक्केपेक्षा जास्त असावे आणि त्यामध्ये व्हेंटिलेशनची सुद्धा चांगली व्यवस्था असावी. लक्षणे नसलेला रूग्ण संक्रमित झाला आहे यास दुजोरा प्रयोगशाळेत तपासणीनंतर दिला पाहिजे.

प्रत्येक वेळी केयरटेकर असावा
रूग्णासाठी प्रत्येक वेळी देखभाल करणारा एक व्यक्ती उपस्थित असावा आणि होम आयसोलेशनच्या दरम्यान केयर टेकर आणि हॉस्पिटलमध्ये संवाद सुरू राहिला पाहिजे. 60 वर्षापेक्षा वयाचे लोक आणि तणाव, डायबिटीज, हार्ट डिसीज, क्रोनिक लंग/लीव्हर/किडनी रोग इत्यादी केसेसमध्ये कोरोना संसर्ग होण्याच्या स्थितीत वैद्यकीय अधिकारी योग्यप्रकारे रूग्णाच्या आरोग्याची तपासणी केल्यानंतरच होम आयसोलेशनची मंजूरी देतील.

ताप नियंत्रित करण्यासाठी पॅरासीटामोल 650 एमजी घ्या
जर ताप नियंत्रणात येत नसेल तर पॅरासीटामोल 650 एमजी दिवसात चारवेळा घेऊ शकता. यानंतर सुद्धा ताप नियंत्रित होत नसेल तर डॉक्टरांशी संपर्क साधा, जे नोप्रोक्सेन 250 एमजी सारखे नॉन-स्टेयरॉयडल अँटी-इंफ्लेमेटरी ड्रग औषधे दिवसात दोन वेळा देऊ शकतात.

आयव्हरमेक्टिन टॅबलेटसुद्धा घेऊ शकता
मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटले आहे की, असे रूग्ण तीन ते पाच दिवसांसाठी आयव्हरमेक्टिन (200 एमसीजी/किग्रॅ) टॅबलेट दिवसात एकवेळा घेऊ शकतात. पाच दिवसापेक्षा जास्त ताप, खोकला राहिल्यास इन्हेलरद्वारे इन्हेलेशनल बूडेसोनाईड दिवसात दोनवेळा 800 एमसीजीचा डोस देऊ शकतात.

घरात रेमडेसिविर घेण्यास बंदी
रेमडेसिविर इंजेक्शन केवळ आणि केवळ हॉस्पिटलमध्ये दिले जाऊ शकते आणि हे घरी ठेवण्याचा प्रयत्न करू नका.