National Green Tribunal (NGT) – Maan Gram Panchayat | बेकायदेशीर कचरा डंपिंग प्रकरण ! माण ग्रामपंचायतीला राष्ट्रीय हरित न्यायधिकारणाकडून 34 लाखांचा दंड

क्लिफ गार्डन सोसायटीच्या याचिकेला यश

पुणे : National Green Tribunal (NGT) – Maan Gram Panchayat | माण ग्रामपंचायतीच्या बेकायदेशीर कचरा डंपिंग बद्दल राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने ३४ लाख दंड ठोठावला असून वन खात्याच्या ताब्यातील अवैध डम्पिंग साईटवर कचरा टाकण्यास आणि जाळण्यास मनाई केली आहे. राजीव गांधी आय टी पार्क ,हिंजवडी फेज -३ जवळील क्लिफ गार्डन सोसायटीने ग्राम पंचायतीच्या अवैध कचरा डम्पिंग विरोधात राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या पुणे खंडपीठात धाव घेतली होती. या याचिकेची सुनावणी होऊन तज्ज्ञ समितीच्या अहवालानंतर न्या. दिनेश कुमार सिंग,तज्ज्ञ सदस्य डॉ विजय कुलकर्णी यांच्या पीठाने नुकताच याबाबत निर्णय दिला. एड. सौरभ कुलकर्णी यांनी क्लिफ गार्डन सोसायटीची,रहिवाश्यांची बाजू मांडली. (National Green Tribunal (NGT) – Maan Gram Panchayat)

या कचऱ्यामुळे कित्येक वर्ष लगतच्या रहिवाशांना आणि सोसायट्यांना त्रास होत होता.
कचरा पेटवून दिला जात असल्याने धुराच्या लोटांना सामोरे जावे लागत होते.
वन खात्याच्या ताब्यात असलेल्या गायरानाच्या जमिनीत वर्षानुवर्षे हा प्रकार चालू होता. (National Green Tribunal (NGT) – Maan Gram Panchayat)

राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने दिलेल्या निवाड्यानुसार माण ग्रामपंचायतीने अवैध रित्या केलेले कचऱ्याचे डम्पिंग
हटवायचे आहे.ते काम सुरु झाले आहे.
ग्राम पंचायतीला ३४ लाख रुपये दंड महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे जमा करायचा आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने त्यातून कचरा व्यवस्थापन प्रकल्प आणि यंत्रणा निर्माण करून माण ग्रामपंचायत
हद्दीतील कचरा निर्मूलन प्रश्नावर,पर्यावरण संवर्धनावर खर्च करायचा आहे.
ग्राम पंचायतीला याकामासाठी लागणारी जागा पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाने पुरवायची आहे.
तोपर्यंत दरमहा १ लाख रुपये दंड महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे जमा करायचा आहे.
क्लिफ गार्डन सोसायटीचे अध्यक्ष गोकुल ओझा यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

Web Title :- National Green Tribunal (NGT) – Maan Gram Panchayat | Illegal garbage dumping case! Maan Gram Panchayat fined 34 lakhs by National Green Tribunal

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Farhad Samji | दिग्दर्शक फरहाद सामजीने सतीश कौशिक यांच्यावर लिहिलेली पोस्ट चर्चेत; म्हणाले “सतीश कौशिक ही अशी पहिली व्यक्ती…..”

Ajit Pawar On Shinde-Fadnavis Govt | आदिवासी महिलेला विवस्त्र करुन मारहाण प्रकरणी विरोधी पक्षनेते अजित पवारांनी सरकारला धरले धारेवर

MP Supriya Sule | खडकवासला आणि उजनी धरणातील प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने उपयोजना करा