अभिनेत्री उशोशी सेनगुप्‍ता म्हणाली, गप्प बसली असते तर झाली नसती ‘छेडछाड’ ; ७ गुंडाना अटक

कोलकाता : वृत्तसंस्था – माजी मिस युनिव्हर्स अभिनेत्री उशोशी सेनगुप्ता हिने तिच्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती सोशल मिडीयाच्या माध्यमातून दिली आहे. तिने मंगळवारी तिच्यासोबत अत्याचार झाल्याचे फेसबुक पोस्ट लिहून सांगितले होते. तिने सांगितले की, माझ्यासोबत घडलेली ही घटना छेडछाडी संदर्भात नाही. या मुद्याचा एक मोठा उद्देश आहे, हा मुद्दा लोकांच्या सुरक्षेविषयी आहे. जर मी शांत बसली असती तर, मला काहीच फरक पडला नसता. परंतु माझ्या ड्रायव्हरला अत्यंत वाईट पद्धतीने मारहाण करण्यात आली.

उशोशी म्हणाली की, एलजीबीटी समाजातील माझी मैत्रीण देखील घाबरली होती. बऱ्याच ठिकाणी लिहिण्यात आलं कि, सात ते आठ लोकांनी माझ्यासोबत छेडछाड केली पण असं काही घडलं नाही. त्यांच्यातील एकाने मला बाहेर ओढण्याचा प्रयत्न केला. कारण माझ्या फोनमध्ये त्याचा व्हिडीओ होता आणि तो त्याला डिलीट करायचा होता. उशोशीने त्या तरुणाचा ड्रायव्हरला मारहाण करतानाच व्हिडीओ काढला होता. म्हणूनच तिचा पाठलाग करण्यात आला.

या प्रकरणात कोलकाता पोलिसांनी ७ जणांना अटक केली आहे.उशोशीने २०१० साली मिस इंडियाचा पुरस्कार जिंकला होता.

काय आहे नेमके प्रकरण ?

त्याच झालं असं की, अभिनेत्री उशोशी तीच काम संपवून कोलकात्यातील एका हॉटेलमधून रात्री १२ च्या सुमारास घरी जात होती. तिच्या सोबत तिची मैत्रीण देखील होती. त्यांनी एक उबेर कॅब बुक केली होती. कॅबने जात असताना अर्ध्या रस्त्यात एक ७ जणांच्या टोळक्याने त्यांची कॅब अडवली. त्यानंतर त्यांनी कॅब ड्राइव्हरला मारहाण केली. उशोशी यांनी घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याला घटनेत लक्ष्य घालण्यास सांगितले. त्यावेळी तो पोलीस अधिकरी म्हणाला की, हि आमच्या क्षेत्रातील घटना नसून भवानीपूर स्टेशनच्या क्षेत्रातील घटना आहे.

उशोशीने सतत विनंती केल्यावर पोलिसांनी काही तरुणांना अटक केली त्यातील काही तरुण पोलिसांना धक्का मारून पळून गेले. त्यानंतर उशोशी आणि तिची मैत्रीण घटना स्थळावरून निघून गेले. त्या तरुणांनी उशोशी आणि तिच्या मैत्रिणीचा पाठलाग केला. जेव्हा ती त्याच्या मैत्रिणीला सोडायला गाडीच्या खाली उतरली. तेव्हा त्या दोघांना तरुणांकडून मारहाण करण्यात आली. उशोशीच्या मोबाईलमधील व्हिडीओ डिलीट करण्याचा प्रयत्न त्या तरुणांनी केला. उशोशीने ड्राइव्हरला मारहाण होत असतानाच व्हिडीओ काढला होता. नंतर तो व्हिडीओ तिने फेसबुकवर शेअर केला आणि या घटनेची माहिती सर्वाना दिली.

या घटनेवर प्रतिक्रिया देताना कोलकाता पोलिसांनी सांगितले की, आम्ही या घटनेला खूप गांभीर्याने घेतले आहे. आतापर्यंत या प्रकरणातील सात लोकांना अटक करण्यात आली आहे. कोलकात्याच्या पोलीस आयुक्तांनी या प्रकरणी चौकशी समिती नेमली आहे.सुरवातीला पोलिसांनी या घटनेबाबत FIR दाखल करण्यास टाळाटाळ केली होती.

आरोग्यविषयक वृत्त

केस काळे ठेवण्यासाठी हे “प्राणायम” करते मदत

वजन कमी करण्यासाठी “व्हिटॅमिन डी ” उपयुक्त

घरगुती उपायांनी काढा चेहऱ्यावरील नको असलेले केस

मनुष्य शरीरातील हाडांविषयी हे माहित आहे का ?

हस्त मुद्रेने घालवा मूळव्याध आणि युरिनची समस्या

पावसाळ्यात अनेकांना होते कावीळ; करा ‘हे’ उपाय


सिने जगत –

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’

‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like