Weather Update : उत्तर भारतात सूर्य ओकतोय आग, काही राज्यात पुढील पाच दिवसांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –  देशात तापमान दिवसेंदिवस वाढत चालले आहे, उष्णतेच्या लाटांनी लोक त्रस्त आहेत. त्याचबरोबर हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार पुढील तीन दिवस यातून विश्रांती मिळण्याची कोणतीही शक्यता नाही. 28 मेनंतरच त्यातून दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. त्याचबरोबर हवामान विभागाने सांगितल्याप्रमाणे बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या जोरदार हवेमुळे पुढील 5 दिवसांपर्यंत आसाम आणि मेघालयात जोरदार पाऊस होईल. अरुणाचल प्रदेशात आज पाऊस पडेल. नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरा येथेही येत्या 5 दिवसांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार 29-30 मे रोजी उत्तर भारतातील काही राज्यात धुळीचे वादळासह आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तापमानात किंचित घट होऊ शकते. आणि भीषण उष्णतेच्या लाटांपासून लोकांना थोडा आराम मिळेल.

रविवारी जरी करण्यात आला होता रेड अलर्ट

दिल्ली, राजस्थान, हरियाणा, पंजाब आणि यूपीच्या बर्‍याच भागात पारा 45 अंशांच्या वर गेला आहे, ज्यामुळे लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. हवामान विभागाने रविवारी एक रेड नोटीस जारी करत म्हंटले होते की, 25-26 मे रोजी उष्णतेच्या लाटा सर्वाधिक असतील आणि लोकांना दुपारच्या वेळी घरातच राहण्याचे निर्देश देण्यात आले. पुढील 2-3 दिवस पंजाब, छत्तीसगड, ओडिशा, गुजरात, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, बिहार आणि झारखंडमध्येही उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता आहे.

ताशी 50-60 किलोमीटर वेगाने वाहणार हवा

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार 29-30 मे दरम्यान दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातही वादळी वाऱ्यासह व पाऊस पडण्याची शक्यता आहे. वरचा वेग देखील 50-60 किमी प्रति तासाने राहील, ज्यामुळे उष्णतेपासून आराम मिळेल.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like