धुळे : देवपुरात राष्ट्रीय महामार्ग क्रं. 3 मुंबई – आग्रा महामार्गवर विद्यार्थ्याची आत्महत्या

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – देवपूरातील  विद्यार्थ्याने महामार्गावर स्वतःला धावत्या ट्रकखाली झोकुन देत आत्महत्या केली. शहरातील मुंबई आग्रा महामार्ग नगावबारी जवळील रस्त्यावर एक विचिञ घटना घडली. देवपूरात राहणारा विद्यार्थी हा राहत्या घरापासून त्याच्या मोटरसायकलने महामार्गावर आला. व कोणाचे काही लक्षात येण्यापुर्वीच त्याने महामार्गावरील एका धावत्या गाडीखाली स्वतःला झोकुन देत आत्महत्या केली. तो जागीच ठार झाला. हि वार्ता देवपूरात परिसरात वाऱ्या सारखी पसरली.

कॉलनीतील नागरीकांनी घटनास्थळी धाव घेतली. यामुळे महामार्गावर गर्दी जमा होऊन महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. पोलीसांनी माहिती कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली परिस्थितीवर नियंञण मिळवत अर्धा तासांनंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.

देवपूरात या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. विद्यार्थांने असे पाऊल का उचलेले याबाबत नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.पश्चिम देवपूर पोलीस पुढील तपास करत आहे.

 

Visit: Policenama.com