लॉकडाऊनमध्ये ‘सैराट’ ! मुस्लीम मुलीने हिंदू मुलासोबत बांधली ‘लग्नगाठ’

गया : वृत्तसंस्था – संपूर्ण जगात फैलावलेल्या कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी बहुतांश देशांनी लॉकडाऊनचा आधार घेतला आहे. भारतातही 3 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आलं आहे. देशात 25 मार्चपासून लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे सर्व व्यवहार आणि कार्यक्रम ठप्प झाले आहेत. पण प्रेम करणाऱ्यांना जगातील कोणतीही ताकद रोखू शकत नाही, खरे प्रेम असेल तर प्रेमी जवळ येण्याचा मार्ग शोधून काढतातच. मग त्यावेळी कोणतीही परिस्थिती आणि कितीही बंधन असली तरी ते जवळ येतातच. असाच एक प्रकार बिहारमधील गया येथे घडला आहे.

बिहारमधील गाया येथे एका हिंदु मुलाने सर्व रुढी-परंपरांना फाटा देत एका मुस्लीम मुलीशी थाटात लग्न केले. अनंत कुमार आणि नसरीन परवीन असे या जोडप्याचे नाव आहे. हे दोघेही बहुआर चौरा मोहल्ल्यातील असल्याचे समजतेय. लॉकडाऊनमुळे सर्व मंदिरं बंद असल्याने त्यांनी येथील विष्णूपद मंदिराच्या परिसरातच लग्न सोहळा उरकला. खूप प्रयत्न करून देखील त्यांचे लग्न लावण्यासाठी एका भटजींना बोलावण्यात आले होते.

अनंत आणि नसरिन यांचे 3 वर्षापासून एकमेकांवर प्रेम आहे. लॉकडाऊनमुळे त्यांना भेटण्यात अडथळा येत होता. नसरीनच्या कुटुंबीयांना या दोघांच्या प्रेमप्रकरणाची मिळाली. यानंतर नसरीनच्या घरच्यांनी तिली बेदम मारहाण केली. तिला एका खोलीत कोंडून ठेवले. मात्र, तिने तेथून पळ काढत ती अनंतला भेटली आणि त्यांनी अगदी फिल्मी स्टाईलने लग्न केले. यासंदर्भात अनंतने सांगितले की, त्याचे कुटुंबीय या लग्नाला तयार होते. मात्र नसरीनच्या नातेवाईकांचा लग्नाला विरोध होता. त्यामुळे त्यांनी तिला प्रचंड मारहाण केली होती.