कमलेश तिवारी मर्डरकेस : दुबईचा कॉम्प्युटर ऑपरेटर ‘मास्टरमाइंड’, हत्येसाठी सूरतमधून घेतलं पिस्तुल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लखनऊमधील हिंदू समाज पार्टीचे अध्यक्ष कलमलेश तिवारी यांच्या हत्येबाबत एक मोठा खुलासा समोर आला आहे. एटीएसच्या सांगण्यानुसार या हत्येचा कट गुजरातमधील सुरत येथे रचण्यात आला आहे. याबाबत एटीएसने तीन लोकांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये मौलवी मोहसिन शेख, रशीद पठान आणि फैजान पठान यांचा समावेश असून दोन शुटर अजूनही फरार आहेत. या हत्येसाठी सुरतमधूनच बंदूक खरेदी झाली असल्याचे एटीएसने सांगितले आहे.

युपी पोलिसांनी घेतली पत्रकार परिषद
डीजीपी ओपी सिंह यांनी सांगितले की अवघ्या चोवीस तासामध्ये या गुन्ह्याचा छडा लावला आहे. यासाठी आम्ही छोट्या छोट्या तुकड्या केल्या आणि राज्या बाहेरील काही संपर्क वापरले. युपी आणि गुजरात पोलिसांच्या कामगिरीमुळे तीन जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये मिठाईचा बॉक्स हा मोठा पुरावा ठरला असल्याचे सिंह यांनी यावेळी सांगितले.

दोन संशयितांवर ठेवली जात आहे नजर
दोन आणखी लोकांना ताब्यात घेतले होते मात्र चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आले मात्र पोलीस त्यांच्यावर लक्ष ठेऊन असल्याचे देखील सिंह यांनी सांगितले. या घटनेचे संबंध थेट गुजरापर्यंत जोडले गेलेले असूनही याबाबत अतिरेकी संबंध अजून तरी अढळले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच तिवारी यांच्या हत्येचे कारण हे त्यांनी केलेली आक्रमक वक्तव्य देखील असू शकतात असे सांगितले जात आहे.

दुबईमध्ये काम करतात आरोपी
एटीएसने सांगितले की तीन आरोपींन पैकी एक जण दुबईला काम करत होता आणि तोच याचा सूत्रधार आहे. तर दुसरा आरोपी मेडिकल रिप्रजेंटेटिव होता. तीनही आरोपींनी सहा महिने आधी या हत्येचे प्लॅनिंग केले आणि 16 ऑक्टोबर रोजी ते मिठाईचा डब्बा घेऊन लखनौ ला पोहचले.

नातेवाईकांनी केली नोकरीची मागणी
तिवारी यांच्या मृत्यू नंतर त्यांच्या घरच्यांनी 5 कोटींची नुकसान भरपाई आणि कुटूंबातील एका व्यक्तीला नोकरी देण्याची मागणी केली आहे. तिवारी यांच्या पत्नीने पाठवलेल्या पत्रामध्ये बिजनौर मधील दोन मौलानांचा उल्लेख केला आहे. दोघेही सध्या फरार आहेत. 2015 मध्ये अनवारुलहक़ ने कमलेश तिवारी यांचे मुंडके उडवणाऱ्याला 51 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

हिंदू महासभा सोडून कमलेशने काढला होता पक्ष
कमलेश हे आधी हिंदू महासभेत मोठ्या पदावरती होते मात्र नंतर त्यांनी स्वतःचा पक्ष काढला. लखनऊमध्ये कमलेश यांना मानणारा मोठा वर्ग आहे त्यामुळे त्यांच्या हत्येची बातमी येताच मोठे तणावाचे वातावरण तयार झाले होते.

नातेवाईकांना भेटण्यासाठी आले होते दिनेश शर्मा
या हत्येनंतर युपीच्या उपमुख्यमंत्र्यांनी तिवारी यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्याचा प्रयत्न केला मात्र लोकांमध्ये एवढा आक्रोश होता त्यामुळे दिनेश शर्मा यांना कुटुंबापर्यंत पोहचता आले नाही. 2018 मध्ये कमलेश यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगितले होते.कुटुंबीयांनी आरोपीना फाशी देण्याची मागणी केली आहे.