OCI व्हिसा कार्डधारकांच्या काही श्रेणींना भारत प्रवासाची मिळाली परवानगी, गृहमंत्रालयाने दिली मंजुरी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गृह मंत्रालयाने ओसीआय (ओव्हरसीज सिटीझन ऑफ इंडिया) कार्ड धारकांच्या काही श्रेणींना भारत प्रवासाची परवानगी दिली आहे. कोविड-१९ महामारीच्या पार्श्वभूमीवर भारताबाहेर सर्व परदेशी नागरिकांचे व्हिसा आणि भारतीय वंशाच्या लोकांचे ओसीआय कार्ड निलंबित केले होते. ते आता दिले गेले आहे.

भारताबाहेर झाले होते परदेशी नागरिकांचे व्हिसा ओसीआय कार्ड निलंबित
कोविड-१९ महामारीच्या पार्श्वभूमीवर भारताबाहेर सर्व परदेशी नागरिकांचे व्हिसा आणि भारतीय वंशाच्या लोकांचे ओसीआय कार्ड निलंबित केले होते. परदेशातून भारतात येणारी बंदी लागू होईपर्यंत हे निलंबन सुरू असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र देशात उपस्थित असलेले सर्व परदेशी नागरिक ज्यांच्या व्हिसाचा कालावधी संपला आहे आणि भारताबाहेर जाऊ शकत नाहीत, ते अतिरिक्त फीशिवाय व्हिसासाठी अर्ज करू शकतात. सध्या भारतात जे ओसीआय कार्ड असलेले नागरिक आहेत त्यांचे कार्ड वैध राहील, परंतु जे भारताबाहेर देशात आहेत त्यांचे कार्ड निलंबित होणार.

ओसीआयसाठी या आहेत अटी
भारताचे मूळ नागरिक असल्यास किंवा पालक भारतीय नागरिक असल्यास ओसीआय कार्ड मिळणे सोपे आहे. पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ, अफगाणिस्तान आणि इराण असे काही देश आहेत जेथे भारतीय वंशाच्या लोकांना ही सुविधा मिळू शकत नाही.

कधीही भारतात येऊ शकतो ओसीआय कार्डधारक
ज्याच्याकडे आयुष्यभरासाठी वैध ओसीआय कार्ड आहे तो जेव्हा पाहिजे तेव्हा व्हिसाशिवाय भारतात येऊ शकतो. या कार्डावर भारतात संपूर्ण आयुष्यभर राहण्यासोबत येथे काम करण्याची सुविधा आणि सर्व आर्थिक व्यवहार करता येतात.