‘हनीट्रॅप’च नाही तर ‘गुरूजी’ आणि ‘बाबाजी’च्या माध्यमातून भारतीय जवानांना फसवतंय पाकिस्तान, लष्करानं दिल्या ‘मार्गदर्शक’ सूचना

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महत्वाची माहिती जावांकडून मिळवण्यासाठी पाकिस्तानकडून हनीट्रॅपचा वापर केला जात आहे. भारतीय दोन अशाच जवानांना अटक करण्यात आली आहे, जे की हनीट्रॅपमध्ये अडकून पाकिस्तानला महत्वपूर्ण माहिती देत होते. भारतीय जवानांना अडकवण्यासाठी पाकिस्तानी लोक आता गुरुजी आणि बाबाजी सुद्धा झाल्याचे समोर आले आहे.

धार्मिक गुरूंच्या नावाचा पाकिस्तानकडून वापर
पाकिस्तानी लष्कराकडून जवानांना अडकवण्यासाठी आणि माहिती मिळवण्यासाठी धार्मिक गुरु आणि बाबाजींच्या नावाचा देखील वापर केला जात आहे. भारतीय लष्कराने याबाबत सर्वांना सतर्कतेचा इशारा दिला असून कोणत्याही प्रकारचे फोन कॉल्स किंवा फेसबुक वरील अशा प्रकारच्या संदेशांपासून लांब राहण्याचा सल्ला देखील जवानांना देण्यात आला आहे.

अनेक ऍप्स पासून लांब राहण्याचे जवानांना आदेश
पाकिस्तानकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून जवानांशी मैत्री करून माहिती काढून घेण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. म्हणून भारतीय जवानांना यु ट्यूब, फेसबुक, टिक टॉक, ड्युओ, अशा प्रकाचे अँप वापरताना खबरदारी घेण्याचा इशारा दिला आहे.

रेल्वे क्लार्ककडूनही माहिती मिळवण्याचा प्रयत्न
पाकिस्तान माहितीत मिळवण्यासाठी देशातील काही महत्वाच्या रेल्वे स्थानकावरील क्लार्क लोकांना देखील फसवण्याचा प्रयत्न करत आहे. झांसी, बबीना, सुरतगढ़, लखनऊ अशा ठिकाणच्या क्लार्कच्या माध्यमातून पाकिस्तान लष्करातील प्रमुख अधिकाऱ्यांच्या प्रवासाबाबत देखील माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.

पोखरामधून दोन जवानांना केली अटक
हनीट्रॅपमध्ये अडकून पाकिस्तानला माहिती देणाऱ्या दोन जवानांना पोखरण येथून अटक करण्यात आली आहे. रवी वर्मा आणि विचित्र बहेरा या दोनीही जवानांना फेसबुकच्या सिरथ ( Seerath ) अशा नावाच्या अकाउंट वरून अडकवण्यात आले होते.

कोणत्याही प्रकारची माहिती न देण्याचे आदेश
भारतीय जवानांना अशा प्रकारच्या सर्व ट्रॅपची माहिती देण्यात आली आहे. तसेच असा प्रकार घडल्यास जवानांनी युद्ध, शस्त्रास्त्रे तसेच अन्य कोणत्याही प्रकारची माहिती शेअर करू नहे असे असे कडक निर्देश लष्कराकडून देण्यात आले आहेत.

जवानांच्या परिवाराला देखील केले जात आहे टार्गेट
भारतीय सेने बाबत माहिती मिळवण्यासाठी पाकिस्तान कोणत्याही थराला जाण्याचा प्रयत्न करत आहे. माहिती मिळवण्यासाठी जवानांच्या परिवाराला सुद्धा पाकिस्तानकडून टार्गेट केले जात आहे. याबाबत काम करणाऱ्या 150 फेसबुक खात्यांची माहिती लष्कराच्या हाती लागली आहे.

Visit : Policenama.com 

Loading...
You might also like