‘लॉकडाऊन’च्या लक्ष्मण रेषेमुळं ‘व्यसनमुक्ती’ची संधी, मिळतील ‘हे’ फायदे,वाचा तज्ज्ञांचा सल्ला

पोलीसनामा ऑनलाइन टीम – सध्या भारतासह संपूर्ण जग कोरोना विषाणूचा सामना करत आहे. त्यामुळे आगामी काळात बर्‍याच लहान-मोठ्या बदलांची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत. आपल्या देशात लॉकडाऊनच्या सध्याच्या काळात बऱ्याच समस्यांना व संकटांना आपण सामोरे जात आहोत. परंतु अशा परिस्थितीतही आपल्याला बर्‍याच नवीन आणि सुखद अनुभव घेण्याच्या संधी देखील मिळत आहेत, जे कधीही शक्य नव्हते ते सध्याला होत आहे.

वातावरणाबाबत बघितले तर वायू प्रदूषण, जल प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषणात एक अकल्पनीय घट झाली आहे. यामुळे चांगले पर्यावरणीय बदल झाले आहेत. यावेळी तीनशे किलोमीटर अंतरावर डोंगराच्या रांगेचे स्पष्ट दर्शन होणे, गंगा, यमुना व इतर नद्यांच्या पाण्याच्या गुणवत्तेत अनपेक्षित सुधारणा होणे किंवा मोठ्या संख्येने पक्षांचे थवे पाहण्यास मिळणे हे सगळे याचे साक्षीदार आहेत. आपल्या आरोग्यावर याचा सकारात्मक परिणाम होणे स्वाभाविक आहे. या लॉकडाऊन दरम्यान नियमित व्यसन करणार्‍यांच्या जीवनशैलीतल्या चांगल्या बदलांचा विचार करणे देखील महत्त्वाचे आहे.

आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की सामान्यत: सिगारेट, गुटखा, तंबाखू, भांग, गांजा, अल्कोहोल, चरस, अफू, कोकेन सारख्या मादक पदार्थांच्या आहारी पडलेल्या लोकांपैकी मोठ्या संख्येने लोक फुफ्फुस, हृदय, किडनी, ब्रेन, त्वचा इत्यादी रोगांचे शिकार होतात. कर्करोगाने ग्रस्त अशा लोकांची संख्या ही सर्वाधिक आहे. आणि विशेष म्हणजे घरी पौष्टिक आहार उपलब्ध असतानाही बाहेर जाऊन जंक, शिळे आणि अस्वच्छ अन्न खाण्याची सवय देखील एखाद्या व्यसनासारखीच आहे. या व्यसनामुळे आपली शरीरयंत्रणा प्रदूषित होते आणि नंतर आजारी पडतो, अशा लोकांच्या संख्येत देखील झपाट्याने वाढ होत आहे. सध्या लॉकडाऊनमुळे या सर्व व्यसनांना आळा बसला आहे आणि या लॉकडाऊनमुळे बऱ्याच लोकांच्या जीवनशैलीत बदल झाले आहेत.

जर आपण व्यसन सोडले तर हे पाच मोठे आरोग्यविषयक लाभ मिळवू शकता:

1. जेव्हा व्यक्ती व्यसन सोडतो तेव्हा अन्नाची योग्य चवीचा आनंद त्यास मिळतो आणि त्यातील पौष्टिक घटकांचे योग्य पचन आणि शोषण होते. यामुळे शरीराचे विविध भाग कार्यरत होतात, ज्याने रक्त परिसंचरण व्यवस्थित होते. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती आणि चयापचय क्रिया देखील सुधारते, आणि विविध रोगनपासून संसर्ग होण्याची शक्यता बर्‍याच प्रमाणात कमी होते.

2. तंबाखूजन्य पदार्थांच्या वापरापासून मुक्त होणारे लोक टीबी, हाय बीपी, न्यूरो समस्या आणि हृदयरोग व्यतिरिक्त कर्करोग टाळण्यास देखील सशक्त होतात. जर आपण यापैकी एक किंवा अधिक आजारांनी ग्रस्त असाल तर योग्य थेरपीद्वारे लवकर बरे होण्याची शक्यता देखील वाढते. यामुळे श्वसनसंस्थेतही मोठ्या प्रमाणात सुधारणा होते.

3. सिगारेट, गुटखा, खैनी, जरदा इत्यादींच्या सेवनातून, विशेषत: तोंड आणि घशाच्या कर्करोगापासून मुक्तता मिळणे सोपे होते आणि पाचक प्रणाली योग्यरित्या कार्य करण्यास सुरवात करते.

4. मद्यपान करणारे लोक यापासून मुक्त झाल्यास यकृत, मूत्रपिंड आणि हृदयसंबंधीच्या आजाराव्यतिरिक्त मधुमेहापासून देखील त्यांची सुटका होते. यामुळे त्यांची संकल्पशक्ती मोठ्या प्रमाणात सुधारते, ज्यामुळे त्यांच्या मानसिक आरोग्यास फायदा होतो. अशा परिस्थितीत आरोग्याच्या अनेक लहान-मोठ्या समस्या सहज सुटतात.

5. चरस, अफू, कोकेन आणि हेरोइनपासून व्यसनमुक्तीचे बरेच फायदे आहेत. या मादक पदार्थांच्या सेवनामुळे ज्यांना मानसिक तणाव आणि वेडेपणा येतो. अशांना निरोगी आयुष्य जगण्याचा मार्ग मोकळा होतो.