राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने घेतली हैदराबादच्या एन्काऊंटरची दखल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शुक्रवारी पहाटे हैद्राबाद पोलिसांनी बलात्काराच्या आरोपाखाली असलेल्या चारही आरोपींचा इन्काऊंटर केला यावेळी आरोपीना गुन्ह्याचा अधिक तपास करण्यासाठी घटनास्थळी नेण्यात आले होते. या वेळी आरोपींनी पोलिसांची हत्यारे घेऊन पळण्याचा प्रयत्न केला आणि यादरम्यान झालेल्या गोळीबारात चारही आरोपी मारले गेले. यानंतर सर्वच स्तरांतून याबाबत प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली होती. मात्र आता या प्रकरणाची गंभीर दखल राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने घेतली असल्याची माहिती मिळतेय.

मानवाधिकार आयोगाने यासाठी विशेष पथकाला घटनास्थळी पाहणी करून चौकशी अहवाल लवकरात लवकर सादर करण्याचे आदेश दिले आहेत. सकाळी केवळ माध्यमांमधूनच याबाबतच्या बातम्या समोर येत होत्या मात्र दुपार नंतर पोलिसांनीच अधिकृतपणे पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली आहे. तत्पूर्वी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने याची गंभीर दखल घेत संदर्भात सुओमोटो याचिका दाखल करुन घेतली. तसेच तातडीने घटनास्थळी जाऊन चौकशीचे आदेशही दिले.

काय सांगितले पोलिसांनी पत्रकार परिषदेत
पोलिसांनी सांगितले की चारही आरोपींना बेड्या घातलेल्या नव्हत्या. यामुळे आरोपींची पोलिसांकडून पिस्तूल ओढून घेतले त्यानंतर ते पळू लागले. त्यानंतर पोलिसांनी त्याना चेतावणी दिली परंतु आरोपींनी उलट फायरिंग सुरु केली. त्यानंतर मात्र पोलिसांनी फायरिंग केली. सकाळी 5.45 ते 6 वाजेपर्यंत म्हणजेच 15 मिनट ही चकमक चालली अशी सर्व माहिती आयुक्त व्ही सी सज्जनार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

दोन पोलीस कर्मचारी जखमी
एन्काऊंटदरम्यान दोन पोलिसही जखमी झाल्याचा आयुक्तांचा दावा आहे. यात एक उपनिरीक्षक आणि एक हवालदार समाविष्ट आहे.तसेच आरोपींचे मृतदेह त्यांच्या कुटुंबियांना सोपवण्यात आल्याची महिती देखील पोलीस आयुक्तांनी यावेळी दिली.

Visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like