पुणे पाेलिसांनी अटक केलेल्या  ‘त्या’ पाच जणांबाबत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून राज्य सरकारला नोटीस 

मुंबई : पाेलीसनामा ऑनलाईन

बंदी असलेल्या माओवादी संघटनेशी संबंध असलेच्या संशयावरुन पुणे पोलिसांनी मंगळवारी देशभरातील सात ठिकाणी घातलेल्या छाप्यात पाच जणांना अटक केली. देशभरात पुणे पोलिसांनी ही कारवाई केली. मात्र आता या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे. या प्रकरणाबाबत आता राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने महाराष्ट्र सरकारला नोटीस पाठविली आहे.
[amazon_link asins=’B078BNQ313′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b7a6916e-ab75-11e8-83d7-81766080df52′]

अटक केलेल्ल्यांमध्ये देशातील नामवंत कार्यकर्ते, समाजसेवक यांचा समावेश आहे. यात सुधा भारद्वाज, गौतम नवलाखा, वेरनोन गोन्सालविस,अरुण पाररिया, वरावर राव यांचा समावेश आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या अहवालानुसार , आयोगाने केलेल्या निरीक्षणानुसार या पाच जणांवर केलेली कारवाई ही पोलिसांच्या ठराविक अधिकृत पोलीस अधिकाऱयांच्या आधिपत्याखाली केले गेलेली नाही. त्यामुळे ही कारवाई मानवाधिकाराचे उल्लंघन आहे. याबाबत आयोगाने मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालक, महाराष्ट्र यांना नोटीस पाठवली आहे . तसेच या प्रकरणी चार आठवड्यात एक वास्तविक अहवाल मागविण्यात आला आहे.

पुणे/पिंपरी : मेकॅनिक इंजिनियरकडून ७ पिस्तूल, १५ काडतुसे जप्त

दरम्यान , सुधार भारद्वाज आणि गौतम नवलाखा यांच्या ट्रान्झिट रिमांडला उच्च न्यायालयाने तातडीने स्थगिती दिल्याने पुणे पोलिसांना झटका बसला आहे़ रात्री उशिरापर्यंत उच्च न्यायालयात याची सुनावणी सुरु होती़ गौतम नवलाखा यांच्या अर्जाची बुधवारी सुनावणी होणार आहे, तर सुधार भारद्वाज यांच्या याचिकेवर गुरुवारी सुनावणी होणार आहे़ तोपर्यंत त्यांना नजरकैदेत ठेवण्याचे आदेश देण्यात आले.

फरिदाबाद येथील सत्र न्यायालयातून सुधा भारद्वाज यांना हजर करण्यात आले़ त्यांना पुणे न्यायालयात हजर करण्यासाठी ट्रान्झिट रिमांड मागण्यात आला़ न्यायालयाने तो मंजूर केला़ पुणे पोलिसांचे पथक त्यांना पुण्याला घेऊन जाण्याची तयारी करीत असतानाच सुधार भारद्वाज यांचे नातेवाईक उच्च न्यायालयात गेले़ त्यांनी तातडीने हेबियस कॉर्प्स याचिका दाखल केली.

सुधा भारद्वाज या गेल्या ३० वर्षांपासून छत्तीसगडमध्ये मजूरांसाठी काम करतात़ त्या १९७८ मधील आयआयटी कानपूर च्या टॉपर आहेत़ त्यांचा जन्म अमेरिकेतील असूनही त्यांनी अमेरिकन नागरिकत्व परत केले आहे़ शालेय शिक्षण इंग्लडमध्ये झाले आहे़त्याची आई कृष्णा भारद्वाज या जेएनयू मध्ये इकोनॉमिक्स विभागाच्या डीन होत्या़ त्या २००७ पासून छत्तीसगड उच्च न्यायालयात वकिली करीत आहेत़ देशात काश्मीर सारखी स्थिती बनविण्याची चिठ्ठी लिहिली असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
[amazon_link asins=’B071HWTHPH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c05920eb-ab75-11e8-becd-a18bbaca7ef7′]

त्तीसगडमधील ट्रेड युनियन कार्यकर्त्या आणि लोकशाही हक्क कार्यकर्त्या सुधा भारद्वाज यांनी सांगितले की, पोलिसांनी आपला लॅपटॉप, मोबाईल, पेनड्राईव्ह सर्व जप्त केला आहे़ त्याबरोबर सोशल नेटवर्किग साइटसचे पासवर्डही घेतले आहेत़ कोरेगाव भीमा अथवा एल्गार परिषदेशी आपला काहीही संबंध नाही, असे सांगितले.

गणेशोत्सवाची सुरुवात करण्यावरुन पुण्यात वाद पेटणार