जाणून घ्या कोण आहेत IAS तेजस्वी राणा ? आमदाराच्या वाहनाला ‘दंड’ ठोठावल्यानं आल्या चर्चेत, ‘सॅल्यूट’ तर बनतोच

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   राजस्थानच्या चित्तोडगड येथे उपविभागीय अधिकारी पदावर काम करणाऱ्या तेजस्वी राणा या अचानक त्यांची बदली झाल्यामुळे चर्चेला आल्या आहेत. लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्या कॉंग्रेसच्या आमदाराच्या कारचे चलन फाडल्यामुळे त्यांची बदली झाल्याचे समजत आहे. स्वतः आमदार त्या गाडीत बसले होते. त्याच दिवशी राणा भाजीपाला बाजारात गेल्या असताना सोशल डिस्टंसिंगचे पालन न केल्यामुळे व्यापाऱ्यांना फटकारले, तसेच जेव्हा व्यापाऱ्यांनी पास दाखवला तेव्हा राणा यांनी ते पास फाडून टाकले. राजस्थान सरकारने मंगळवारी रात्री उशिरा चित्तौडगड उपविभागाच्या अधिकारी तेजस्वी राणा यांची बदली आरोग्य विमा एजन्सीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर केली. केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी सरकारच्या या कारवाईला दुर्दैवी म्हटले आहे, तर राजस्थान भाजपा अध्यक्ष सतीश पूनिया यांचे म्हणणे आहे की, सरकार चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना आपला निशाणा बनवते. जाणून घेऊया कोण आहेत आयएएस तेजस्वी राणा? ज्यांच्याबद्दल जाणल्यावर तुम्ही नक्कीच सॅल्यूट कराल.

यूपीएससी परीक्षेत राष्ट्रीय पातळीवर १२ वा क्रमांक

कुरुक्षेत्रमधील शिक्षण क्षेत्रात तेजस्वी राणा यांनी यूपीएससी परीक्षेत राष्ट्रीय स्तरावर १२ वा क्रमांक पटकावला आणि मुली कुणापेक्षा कमी नाहीत हे सिद्ध केले. फक्त घरीच तयारी करून त्यांनी इतका मोठा पराक्रम केला असून तेजस्वी यांनी घरी राहून फक्त एका वर्षात यूपीएससीची तयारी केली होती. १ जून २०१७ पूर्वी तेजस्वीला कोणी ओळखत नव्हते, परंतु त्यानंतर तेजशवी २०१७ मध्ये कुरुक्षेत्रचा सर्वात चर्चेचा विषय झाली. तेजस्वी यांनी डिजिटल युगात ऑनलाइन तयारी केली. कुवीच्या अर्थशास्त्र विभागाचे प्रो. कुलदीप राणा आणि डॉ. सुनीता राणा यांची कन्या तेजस्वीने स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर केंद्र सरकारच्या बेटी-पढ़ाओ बेटी बचाओच्या घोषणेचा खरा अर्थ सांगितला आहे.

मोठमोठ्या कोचिंग सेंटरमला दाखवला आरसा

तेजस्वी यांनी घरी बसूनच तयारी करून मोठमोठया कोचिंग सेंटरला आरसा दाखवला होता. तेजस्वी यांनी सांगितले की, आई-वडिलांच्या मार्गदर्शनाने तयारी केली. याशिवाय ऑनलाइन मार्गदर्शन करून तयारी केली. तेजस्वी यांना सुरुवातीपासूनच प्रशासकीय सेवेत जायचे होते. हा निर्णय आपल्या आई-वडिलांच्या म्हणण्यावरून किंवा कोणाचा सल्ला घेऊन नाही घेतला, तर हा त्यांचा स्वतःचा निर्णय आहे.

यूपीएससी परीक्षेत जायचे कारण देखील मनोरंजक

कुरुक्षेत्रमधील डीएव्ही वरिष्ठ माध्यमिक विद्यालयामधून शिक्षण पूर्ण केल्यावर तेजस्वी बीएससी इकॉनॉमिक्स करण्यासाठी आयआयटी कानपूरला गेल्या होत्या. आयआयटी कानपूरमधून बी.टेक करणाऱ्या तेजस्वी यांनी यूपीएससी परीक्षेला जाण्याचे कारणही इंटरेस्टिंग सांगितले. तेजस्वी म्हणाल्या की, आयएएस अधिकारी महाविद्यालयात बर्‍याच वेळा कार्यक्रमासाठी येत असत, मग त्यांचे बोलणे आणि निर्णय घेण्याच्या क्षमतेने मजबूर केले कि यूपीएससीसाठी तयारी नक्की करावी. सन २०१५ मध्ये तेजस्वी यांनी प्रथमच परीक्षा दिली, परंतु त्यावेळी इतकी तयारी करता आली नव्हती. काही दिवसांपूर्वी बॅचलर पदवी परीक्षा संपली होती आणि डिसेंबरमध्ये परीक्षा दिली होती, पेपरच्या मेन्स पास होऊ शकल्या नव्हत्या, परंतु तेजस्वी यांनी हार मानली नाही, पुन्हा घरी तयारी केली आणि यावेळी परिणाम समोर आला.

देशाच्या विकासात योगदान देऊ इच्छित आहेत तेजस्वी

प्रशासकीय सेवेत १२ वा क्रमांक मिळवलेल्या तेजस्वी देशाच्या विकासात आपले योगदान देण्यासाठी तत्पर आहेत. तेजस्वी यांचे मिशन केवळ आयएएस पद मिळवणे नाही, तर त्यांना आपल्या देशात काम करण्याची उत्कट इच्छा आहे. तेजस्वी यांना एक मॉडेल तयार करायचे आहे, ज्यामुळे त्यांच्यासारख्या इतर तरुणांना भारताच्या सर्वांगीण विकासासाठी हातभार लावायला पुढे आणता येईल.