मध्य प्रदेश सत्तासंघर्ष ! 16 एप्रिलपूर्वी बहुमत चाचणी व्हावी, भाजपची राज्यपालांकडे मागणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वात भाजपचे प्रतिनिधीमंडळ शनिवारी राज्यपाल लालजी टंडन यांना भेटले. त्यांनी राज्यपालांना 16 मार्च पूर्वी विधानसभा सत्र आयोजित करणे आणि फ्लोर टेस्ट आयोजित करण्याची विनंती केली आहे. त्यांनी बहुमत चाचणीच्या व्हिडिओग्राफीसाठी राज्यपालांना विनंती केली आहे. यावेळी शिवराज सिंह चौहान यांच्याशिवाय गोपाल भार्गव, नरोत्तम मिश्रा, भूपेंद्र सिंह उपस्थित होते.

आतापर्यंत 22 आमदारांनी मध्यप्रदेश विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा सोपवण्यात आलेला होता परंतु ते राजीनामे स्वीकारण्यात आलेले नव्हते. ज्योतिरादित्य शिंदे भाजपात दाखल झाल्यानंतर 22 आमदारांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे कमलनाथ सरकारच्या अस्तित्वावर संकट आले आहे. विधानसभेचे अध्यक्ष एनपी प्रजापति यांनी राजीनामा देणाऱ्या सर्व आमदारांना नोटीस बजावत हजर राहण्यास सांगितले आहे. हे आमदार बंगळुरुत असल्याचे सांगितले जात आहेत, 15 तारखेपर्यंत त्यांना त्यावर उत्तर द्यायचे आहे.

अशावेळी होऊ शकत नाही बहुमत चाचणी –
काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह म्हणाले की 19 काँग्रेस आमदारांना भाजपने अडवून ठेवले आहेत. अशात बहुमत चाचणी होऊ शकत नाही, कारण 19 आमदारांद्वारे देण्यात आलेले राजीनामे स्वीकारण्यात आलेले नाही. त्यांनी स्वत: समोर यायला हवे. ते पुढे म्हणाले, काँग्रेसच्या आमदारांना भाजपने कर्नाटक पोलिसांद्वारे बंधक बनवण्यात आले आहे. आमचे मंत्री जीतू पटवारी आणि लाखन सिंह यांच्यासोबत गैरव्यवहार केला जात आहे.