होळीला आदिवासी महोत्सवात खासदार नवनीत राणा यांनी केले नृत्य (व्हिडिओ)

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – होळीच्या निमित्ताने अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी मेळघाटचा दौरा केला. मेळघाटमध्ये यावेळी आदिवासी नृत्याचे आयोजन करण्यात आले होते. आदिवासींचे नृत्य पाहून खासदार नवनीत राणा स्वत:ला रोखू शकल्या नाहीत त्यांनी देखील आदिवासी बांधवांसोबत तालावर ठेका धरला.

नवनीत राणा यांनी 2019 साली लोकसभा निवडणूकीत अपक्ष लढत विजय मिळवला होता. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे समर्थन होते. त्यांनी मॉडेल आणि अभिनेत्री म्हणून देखील काम केले आहे. 2011 साली त्यांचा विवाह आमदार रवि राणा यांच्याशी झाला. त्यानंतर त्या राजकारणात सक्रीय झाल्या.

काही दिवसांपूर्वी कोरोना व्हायरसच्या भीतीने खासदार नवनीत राणा संसदेत मास्क घालून आल्या होत्या. तेव्हा देखील त्या चर्चेत आल्या होत्या. संसदेत त्या मास्क लावूनच बोलल्या. संसदेत बोलताना त्या म्हणाल्या होत्या की जे लोक परदेशात जात आहेत त्यांना आपण रोखत आहोत परंतु जे लोक परदेशात जाऊ इच्छित आहेत त्यांचे कोणतेही नुकसान होऊ नये. मी परराष्ट्र मंत्र्यांना आणि आरोग्य मंत्र्यांना ही विनंती करु इच्छिते की त्यांनी यावर विचार करावा.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like