Video : रेल्वेची मोठी घोषणा ! … तर रेल्वे आणि स्टेशनमध्ये ‘फ्री’ घ्या खाद्यपदार्थ आणि अन्य सामान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय रेल्वेने या टोकापासून त्या टोकापर्यंत सर्व राज्यांना जोडत प्रवाशांना आपली सेवा उपलब्ध करुन दिली, रोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करण्यास पसंती देतात. अशातच मोदी सरकारने रेल्वेत मिळणाऱ्या सुविधांमध्ये आणि स्वच्छतेवर विशेष लक्ष दिले आहे. रेल्वे अनेक असे नवे बदल केले आहेत ज्याने प्रवाशांना थेट लाभ घेता येईल. आता रेल्वेकडून स्टेशनवर खाद्यपदार्थ विकणाऱ्यावर प्रतिबंध आणण्यास सुरुवात केली आहे. रेल्वे मंत्री पीयुष गोयल यांनी एक व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला आहे. त्यात त्यांनी सांगितले की, जर स्टेशनवर विक्री करणाऱ्या विक्रेत्याने तुम्हाला खरेदीचे बिल दिले नाही, तर त्यांना पैसे देण्याची गरज नाही. ते सामान तुमच्यासाठी फ्री असेल.

तर अन्न आणि वस्तू मिळणार फ्री

रेल्वेने प्रवास करणाऱ्या लाखो लोकांना रेल्वे मंत्रालयाने घेतलेला हा निर्णय मोठा आहे. रेल्वेने ‘नो बिल नो पेमेंट’चे धोरण गुरुवार पासून सर्व स्टेशनवर लागू करण्यात आले आहे. याअंतर्गत स्टेशन आणि रेल्वेत सामान विकणाऱ्याने बिल दिले नाही तर खरेदी केलेले सामान पुर्णपणे मोफत असेल. यामुळे योग्य दरात ग्राहकांना सामान खरेदी करता येईल आणि भ्रष्टाचारावर लगाम लावता येईल. मोदी सरकारने उचलेले हे पाऊल महत्वपूर्ण आहे.

सरकारने विक्रेत्यांवर आणले बंधन

रेल्वे आणि स्टेशनवर विक्रेत्यांकडून मनमानी कारभाराच्या तक्रारी येत आहेत. विक्रेते पाणी बॉटल आधिक किंमतीने विकताना दिसतात. त्यामुळे प्रवाशांची लूट होते. पंरतू सरकारने आता अशा विक्रेत्यांवर बंधन आणण्यासाठी त्यांना ५ रुपयांवर देखील बिल मागितले आहे ज्यामुळे पारदर्शकता येईल. याचा फायदा रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना होणार आहे.

नो बिल, नो पेमेंट

भारतीय रेल्वेने ‘नो बिल, नो पेमेंट’ हे धोरणा राबवण्यावर जोर दिला आहे. यातून प्रवाशांची होणारी लूट थांबवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. कारण रेल्वेमध्ये आणि रेल्वे स्टेशनवर विक्रेत्यांकडून आवाच्या सवा किंमत लावून वस्तूंची विक्री विक्रेते करत असतात आणि त्यांचे बिल देखील देत नाहीत. त्यामुळे ग्राहकांवर अन्याय होतो. म्हणून विक्रेत्याने ग्राहकांना बिल दिले नाही तर ती वस्तू किंवा अन्नाचे पैसे ग्राहकांने देऊ नये ते फ्री समजावे असे रेल्वे मंत्र्यांकडून सांगण्यात आले आहे.

Loading...
You might also like