रेल्वेनं मीडिया रिपोट्स ठरविले चुकीचे, 15 एप्रिलपासून ट्रेन चालविण्याची कोणतीही योजना नसल्याचं सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय रेल्वेने गुरुवारी त्या सगळ्या मीडिया रिपोर्टसचे खंडन केले आहे, ज्यात दावा केला गेला होता कि २१ दिवसांचा लॉकडाऊन संपल्यानंतर १५ एप्रिलपासून ट्रेन पुन्हा सुरु होणार आहेत.

रेल्वेने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रेल्वे मंत्रालयाने लॉकडाऊननंतर प्रवाशांसाठी ट्रेन चालवण्यासाठी कोणताही प्रवासी प्रोटोकॉल जारी केलेला नाही, जसे कि मीडिया रिपोर्टमध्ये सांगितले गेले आहे. अशा वेळी प्रवासी सेवा पुन्हा सुरू करण्याच्या निकषांविषयी अनुमान काढणे अकाली असल्याचे रेल्वेने म्हटले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, रेल्वे प्रवाशींसह सगळ्या स्टेक होल्डर्सचे हित लक्षात घेतच कोणताही निर्णय होईल. सगळ्या संबंधित लोकांना विनंती आहे की त्यांनी मीडियाकडून दाखवल्या जाणाऱ्या भ्रामक गोष्टींकडे लक्ष देऊ नये. रेल्वेने म्हटले की, जेव्हा यासंबंधी कोणताही निर्णय घेतला जाईल तेव्हा सगळ्या संबंधितांना याबाबत सूचित केले जाईल.

लॉकडाऊननंतर रेल्वे सेवा सुरू करण्यात येतील, अशा काही वृत्तानंतर भारतीय रेल्वेची प्रतिक्रिया समोर आली असून त्यांनी १४ एप्रिलनंतर पुन्हा रेल्वे सेवा सुरू करण्याची योजना तयार केली आहे. रेल्वे स्थानकात प्रवेश करण्यापूर्वी प्रवाशांची थर्मल स्क्रीनिंग होईल, प्रवाशांना रेल्वे सुरु होण्याच्या ४ तास आधी स्टेशनवर यावे लागेल.

कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी भारतीय रेल्वेने २४ मार्च ते १४ एप्रिल दरम्यान प्रवासी, मेल आणि एक्सप्रेस ट्रेन सेवा निलंबित केल्या आहेत. देशभरात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा व्हावा यासाठी विशेष मालवाहतूक आणि विशेष पार्सल ट्रेन चालू आहेत. रेल्वेने सर्व आवश्यक वस्तूंचे शीघ्र वितरण करण्यासाठी विशेष पार्सल गाड्यांसाठी देखील वेळापत्रक तयार केले आहे.