Indian Railway : जेव्हा पुरूष करायचे तेव्हा नाही झालं काम, पण महिलांनी तर कमालच केली, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ईशान्य रेल्वेच्या यांत्रिकी कारखान्याचे चित्र बदलले आहे. व्यवस्थापनाने महिलांना ट्रिमिंग शॉप चे काम सोपविले आणि त्यामुळे मोठी कमालच झाली. जे लक्ष पुरुषांकडून पूर्ण होऊ शकत नव्हते, ते लक्ष महिलांनी साध्य करून दाखवले आहे. कारखान्याच्या ट्रिमिंग शॉपमध्ये काम करणार्‍या या ३४ महिलांकडून पत वाचवण्यासाठी धडपड करणाऱ्या कारखान्यांना मजबूत पाठिंबा मिळाला आहे. उत्पादनात नोंदवलेल्या गुणात्मक वाढीमुळे इतर सहकाऱ्यांना देखील प्रेरणा मिळाली आहे.

ट्रिमिंग शॉपमध्ये ट्रेनच्या जनरल बोग्यांमधील सीट तयार करण्याचे काम केले जाते. एक वर्षापूर्वी २०० सीटदेखील वेळेवर उपलब्ध होत्या नव्हत्या, आज या महिला कामगार दररोज आणि वेळेवर सुमारे ३०० सीट तयार करीत आहेत. डिसेंबर २०१८ पर्यंत, पुरुष आणि स्त्रिया दोघांनीही ट्रिमिंग शॉपमध्ये एकत्र काम केले. त्या वेळी, केवळ उत्पादकताच नव्हे तर गुणवत्तेचे प्रश्न वारंवार उद्भवले. दरम्यान कारखाना व्यवस्थापनाने एक मोठे पाऊल उचलले आणि जानेवारी २०१९ मध्ये हे शॉप महिलांच्या हवाली केले. व्यवस्थापनाने महिलांवर विश्वास दाखवला आणि महिलांना तो आपल्या कामातून सिद्धही करून दाखविला.

जवळपास एका वर्षातच महिला कर्मचार्‍यांनी या शॉपचे स्वरूपच बदलले आहे. जेव्हा कामाचे वातावरण निर्माण झाले, तेव्हा आपोआपच गुणवत्ता देखील वाढली. आता सीट पुन्हा बांधाव्या लागत नाहीत. पर्यवेक्षक रेमंड पॉल म्हणतात की आता बोग्यांमध्ये सीट वेळेवर ठेवण्यात काहीच हरकत नाही. सीट देखील चांगल्या तयार होत आहेत. तसेच कनिष्ठ अभियंता कविता सिंह म्हणाल्या की व्यवस्थापनाने संधी देऊन महिलांचा सन्मान वाढविला आहे. सर्व महिला पूर्ण निष्ठेने काम करतात. महिलांसाठी अत्याधुनिक मशीन्स व इतर सुविधादेखील पुरविल्या गेल्या आहेत.

शॉप कामगार अनिता यादव यांनी सांगितले की मी ११ वर्षांपासून या कारखान्यात कार्यरत आहे. पूर्वी परिस्थिती चांगली नव्हती, आता एक चांगले वातावरण निर्माण झाले आहे. जे काही लक्ष पूर्ण करण्यास दिले जाते ते आम्ही सगळे मिळून अधिक चांगल्या प्रकारे पूर्ण करतो. कारखाना व्यवस्थापन सुविधांकडेही लक्ष देते. ईशान्य रेल्वेचे सीपीआरओ पंकज कुमार सिंह म्हणाले की, यांत्रिकी कारखान्यात काम करणाऱ्या महिलांनी आपली क्षमता सिद्ध केली आहे. रेल्वेला त्यांच्या समर्पणाचा फायदा झाला.