COVID-19 च्या टेस्टसाठी ‘स्वदेशी’ किट विकसित, किंमत आयात केलेल्या अनेक किटपेक्षा ‘चौप्पटी’नं कमी, जाणून घ्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसविरूद्ध लढण्यासाठी सर्व देश चिंतेत आहे. शास्त्रज्ञ त्याची लस आणि औषधे तयार करण्यात व्यस्त आहेत. अशा स्थितीत भारताने कोविड -19 विरुद्ध लढा देण्यासाठी स्वस्त किट तयार केले असून त्याला व्यावसायिक परवानगी मिळाली आहे. जर्मनीकडून आयात केलेल्या किटपेक्षा या किटची किंमत एक चतुर्थांश कमी असणार आहे.

सहा आठवड्यात केले पूर्ण
पुण्यातील डायग्नोस्टिक कंपनी मायलॅब डिस्कव्हरी सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेडने पहिले मेड इन इंडिया मॉलीक्यूलर डायग्नोस्टिक किट डिझाइन केले आहे. कंपनीने कोविड -19 शी लढण्यासाठी सहा आठवड्यात उपलब्ध केले आहे. मायलॅब पॅथोडिटेक्ट कोविड -19 क्वालिटीव्ह पीसीआर किट ही केंद्रीय फार्मास्युटिकल स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (सीडीएससीओ) कडून व्यावसायिक मान्यता मिळविणारी अशी पहिली किट आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) मूल्यांकनात 100% संवेदनशीलता आणि विशिष्ठता मिळविणारी ही एकमेव भारतीय कंपनी आहे.

सर्वात कमी लोकांती तपासणी
सद्यस्थितीत जगामध्ये भारत तपासणीच्या प्रकारणामध्ये सगळ्यात मागे आहे. दर दहा लाख लोकांमध्ये 6.8 चाचण्या होत आहेत. दक्षिण कोरिया आणि सिंगापूरसारख्या देशांमध्ये कोरोना व्हायरसच्या संसर्गाचे प्रमाण वाढले आहे. त्याबरोबरच तिथे तपासणीचे प्रमाण वाढले आहे.

किट जर्मनीतून येत आहे
कोरोना व्हायरसची तपासणी करण्यासाठी आतापर्यंत भारत सरकारने जर्मनीकडून लाखो किट मागविल्या आहेत.

दर आठवड्याला एक लाख चाचणी किट
मायलॅबने आश्वासन दिले की, ते दर आठवड्याला एक लाख चाचणी किट तयार करू शकते, आवश्यक असल्यास वाढविली जाऊ शकते. यासह, कंपनीचा दावा आहे की, एका किटद्वारे सुमारे 100 लोकांची चाचणी केली जाऊ शकते. स्वयंचलित पीसीआरद्वारे सरासरी लॅब दररोज एक हजाराहून अधिक रुग्णांची तपासणी करू शकते.

कमी किंमत, त्वरित परिणाम
स्थानिक चाचणी किटचे स्त्रोत मिळणे भारतासाठी मोठे यश असेल. या चाचणी किटची किंमत सध्या विकत घेतलेल्या चाचणी किटच्या चतुर्थांश असेल. याव्यतिरिक्त, मायलॅब पॅथो कोविड -19 चे संसर्ग 2.5 तासात शोधू शकतील, तर आतापर्यंत उघडकीस आलेल्या किट्स सात तासांपेक्षा जास्त वेळात करत आहेत. म्हणजेच लॅब मशीनवर एकाच वेळी दोन प्रतिक्रिया करण्यास सक्षम होईल.

डब्ल्यूएचओचे मार्गदर्शक बनले आधार
कोविड -19 ची ही किट जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) मार्गदर्शक सूचनांनुसार तयार केली गेली आहे. मायलॅब सध्या ब्लड बॅंक आणि रुग्णालये तपासणीसाठी रक्तदात्यासाठी आयडी-एनसीटी तपासणी, एचआयव्ही, एचबीव्ही आणि एचसीव्ही किट देखील तयार करते. कोविड -19 किट तयार करण्यासाठी मायलॅबला भारताच्या औषधी महानियंत्रक (डीसीजीआय)द्वारे मान्यता दिली आहे. त्याचवेळी आयसीएमआरने या किटचे मूल्यांकन केले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like