‘Kill Narendra Modi’ : कोण रचतंय PM च्या हत्येचा कट ? NIA नं केलं अलर्ट

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येविषयी एक मोठे षडयंत्र समोर आले आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेला (NIA) काही धमकी देणारे ई-मेल प्राप्त झाले आहेत. ज्यामध्ये पंतप्रधान मोदींची हत्या करणार असल्याच सांगितले गेले आहे.

पंतप्रधान मोदींच्या हत्येचा कट उघडकीस आला

या ईमेलमध्ये फक्त 3 शब्द वापरले गेले आहेत आणि असे लिहिले आहे की “किल नरेंद्र मोदी”. मीडिया रिपोर्टनुसार NIA ने केंद्रीय गृह मंत्रालयाला याबाबत सतर्क केले आहे, पत्र लिहून देखील याबद्दल माहिती दिली आहे. त्यानंतर गृहमंत्रालयाने ही माहिती SPG ला दिली आहे, ज्यावर पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी आहे.

NIA ने गृह मंत्रालयाला या धमकीबद्दल माहिती दिली

या क्षणी ई-मेलची तपासणी सुरू केली गेली आहे. मीडिया रिपोर्टनुसार NIAने गृह मंत्रालयाला एक पत्र लिहून पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी असलेल्या ईमेलची माहिती दिली आहे.

नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (NIA) आपल्या पत्रामध्ये असे लिहिले आहे की, “NIA ला एक E-mail I’d प्राप्त झाला आहे ज्याच्या मध्ये काही मान्यवरांचा हत्याच बोलल गेल आहे. ई-मेलमधील कंटेंट याची पुष्टी करते आहे.” NIA ने आपल्या पत्रासह ई-मेलची एक प्रत देखील संलग्न केली आहे. NIA ने ही गृह मंत्रालयाला या संदर्भात योग्य ती कारवाई करण्याची विनंती केली आहे.

धमकी लक्षात घेता सुरक्षा संस्था सतर्क राहतात

हे जाणून घेणे देखील महत्त्वाचे आहे की हा ई-मेल 8 ऑगस्ट रोजी जारी करण्यात आला होता. ज्यासह थेट पंतप्रधानांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याची बाबही समोर आली आहे. ते पाहता सुरक्षा यंत्रणा जागरुक झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार धोक्याच्या दृष्टीने पंतप्रधानांची सुरक्षा अधिक कडक केली गेली आहे.

या अहवालानुसार NIA ने या प्रकरणात आपल्या वतीने कोणताही तपास केलेला नाही. NIA अनेक प्रमुख सुरक्षा संस्थांशी संपर्कात आहे. यामध्ये रॉ (RAW), इंटेलिजेंस ब्युरो (IB), डिफेन्स इंटेलिजन्सच्या प्रतिनिधींचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरूद्ध द्वेष पसरविण्याचा प्रचार केला जात आहे, त्यावेळी हा खुलासा झाला आहे. या प्रकटीकरणानंतर बाह्य घटक आणि दहशतवादी कारवायांविरूद्ध असणारी प्रवृत्ती वाढली आहे आणि सुरक्षा संस्था सतर्क आहेत.