‘जमीयत-ए-उलेमा-ए-हिंद’नं मुस्लिमांना केलं आवाहन, म्हणाले – ‘लॉकडाऊनच्या सूचनांचे पालन करा’

नवी दिल्ली :   वृत्तसंस्था –   जमीयत-ए-उलेमा-ए-हिंद यांनी देशातील मुस्लिमांना सर्व लॉकडाऊन मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे आवाहन केले असून रमजानच्या वेळी घरातच राहा आणि सर्व धार्मिक पद्धतींचे पालन करा. जमीयत-ए-उलेमा-ए-हिंदचे सरचिटणीस मौलाना महमूद मदानी यांनीही मुस्लिम समाजाला गरिबांना मदत करून ‘सेहरी’ आणि ‘इफ्तार’चे पालन करण्याचे आवाहन केले.

ते म्हणाले की, भारतीय मुस्लिमांना असे निवेदन आहे की त्यांनी विनाकारण घराबाहेर पडू नये आणि लॉकडाऊन मार्गदर्शक सूचनांचे पूर्ण पालन करावे. रमजानच्या वेळी मुस्लिमांना घरी नमाज अर्पण करण्याची विनंती केली. तत्पूर्वी केंद्रीय अल्पसंख्याक कार्यमंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी गुरुवारी रमजानच्या पवित्र महिन्यात लॉकडाऊन मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश राज्य वक्फ बोर्डाला दिले होते.

मुस्लिम बांधवांनी वैद्यकीय कर्मचारी, सुरक्षा दले, प्रशासकीय अधिकारी, स्वच्छता कामगारांना सहकार्य करावे अशी विनंती नकवी यांनी केली होती. ते म्हणाले कि ते फक्त त्यांचा जीव धोक्यात घालत नाहीयेत तर तुमच्या सुरक्षिततेसाठी काम करत आहेत. आपण क्वारंटाइन आणि आयसोलेशन केंद्रांबद्दल पसरलेली अफवा आणि चुकीची माहिती नष्ट केली पाहिजे, कारण अशी केंद्रे केवळ लोक, त्यांचे कुटुंब आणि समाज यांना महामारीपासून वाचवण्यासाठी तयार केली आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गेल्या २४ तासांत देशात आणखी १५५३ प्रकरणं समोर आली असून संक्रमित रूग्णांची संख्या १७२६५ वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासात संक्रमणामुळे ३६ लोकांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा ५४३ झाला आहे. आतापर्यंत २५६४ लोक या आजाराने बरे झाले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव्ह अग्रवाल यांच्या म्हणण्यानुसार, लोक आता या आजाराने वेगाने बरे होत आहेत आणि आता हा आकडा आता १४.७५ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.