कमलनाथ यांनी पुन्हा मागितले ‘सर्जिकल’ स्ट्राइकचे पुरावे, लष्कराच्या शौर्यावर पुन्हा ‘प्रश्नचिन्ह’ ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नुकतेच सर्जिकल स्ट्राइकचे पुरावे मागणारे आणि वादात सापडलेले मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राइकवर शंका उपस्थित करत पुरावे मागितले आहेत. आपल्या मुद्द्यावर कायम राहत त्यांनी सवाल उपस्थित केला की, सर्जिकल स्ट्राइकचे ना की कोणतेही आकडे समोर आले ना कोणतेही फोटो. सोशल मीडियावर यावर फक्त चर्चा सुरु आहे.

मुख्यमंत्री कमलनाथ यांनी सर्जिकल स्ट्राइकवर पुन्हा पुरावे मागत विचारले की, ना कोणतेही आकडे, न फोटो. फक्त सोशल मीडियावर चर्चा. आपले लष्कर, हवाई दल कोणतेही फेक काम करत नाही परंतु माहिती तर द्या.

याआधी कमलनाथ म्हणाले की, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 90 हजार पाकिस्तानी सैनिकांचे आत्मसमर्पण केले होते, यावर कोणीही काहीही बोलत नाही. हे मात्र सांगतात की आम्ही सर्जिकल स्ट्राइक केला. कोणता सर्जिकल स्ट्राइक ? देशाला याबद्दल थोडी फार माहिती तर द्या.

पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल –
ते म्हणाले की, राष्ट्रवादाचा विचार केला तर त्यांच्या पक्षात असे कोणी आहे का ज्यांनी स्वातंत्रता संग्राम आंदोलनात भाग घेतला. कमलनाथ यांनी देशातील बेरोजगारीवर प्रश्न उपस्थित करुन सांगितले की, पंतप्रधान मोदी रोजगार आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासंबंधित बोलत नाहीत. मी तुम्हाला विचारतो की मोदींनी मागील सहा महिन्यात तरुणांच्या संबंधित काही बोलल्याचे ऐकले आहे ? शेतकऱ्यांच्या कल्याणाचे काही बोलल्याचे ऐकले आहे ?