मेडिकल ऑक्सीजनचे चारही स्त्रोत – सिलेंडर, कॉन्सेंट्रेटर, प्लांट आणि लिक्विड ऑक्सीजन टँकबाबत जाणून घ्या ए-टू-झेड

नवी दिल्ली : वृत्त संस्था – देशात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत मेडिकल ऑक्सीजनची टंचाई आणि गरज यावर मोठी चर्चा सुरू आहे. ऑक्सीजन न मिळाल्याने अनेक रूग्णांचा जीव गेला आहे. अशावेळी याची बेसिक माहिती प्रत्येकाला असणे आवश्यक आहे. जेणेकरून मेडिकल ऑक्सीजन आणि त्याच्या स्त्रोतांचे महत्व समजू शकते. सिलेंडर, कॉन्सेंट्रेटर, प्लांट आणि लिक्विड ऑक्सीजन टँक बाबत जाणून घेवूयात…

ऑक्सीजन सिलेंडर
कम्प्रेस्ड गॅसला ऑक्सीजन सिलेंडरमध्ये स्टोअर केले जाऊ शकते. गॅस मॅन्युफॅक्चरिंग प्लांटमध्ये ऑक्सीजन गॅस या सिलेंडरमध्ये भरला जातो. ही प्रक्रिया क्रायोजेनिक डिस्टिलेशन किंवा प्रेसर स्विंग अब्जॉर्शन (पीएसए) द्वारे होते. हा सिलेंडर हॉस्पिटलमध्ये मशीनद्वारे किंवा एखाद्या रूग्णाला थेट लावला जाऊ शकतो. इतर स्त्रोतांच्या तुलनेत ऑक्सीजन सिलेंडरची किंमत कमी असते. पण याचा मेंटनन्स, रिफिलिंग आणि ट्रान्सपोर्टेशन महाग पडते. अ‍ॅम्ब्युलन्समध्ये सुद्धा याचा वापर होतो.

ऑक्सीजन कॉन्सेंट्रेटर
ऑक्सीजन कॉन्सेंट्रेटर वीजेवर चालणार असे उपकरण आहे, जे वातावरणातून ऑक्सीजन संकुचन करू शकते. कॉन्सेंट्रेटरमध्ये पीएसए म्हणजे प्रेशर स्विंग अब्जॉर्शन तंत्राचा वापर होतो. हा नायट्रोजन काढून 95.5 टक्के कॉन्सेंट्रेड ऑक्सीजन बनवतो. महत्वाचे म्हणजे हा पोर्टेबल असतो, कुठेही नेता येतो. घरासाठी सुद्धा ऑक्सीजन कॉन्सेंट्रेटर डिजाईन केले जातात. याचा कमाल फ्लो रेट 5 ते 10 लीटर प्रति मिनिट असतो. तज्ज्ञ 10 लीटरच्या मशीनला चांगला ऑक्सीजन कॉन्सेंट्रेटर मानतात. फ्लो-मीटर स्डँटसारख्या उपकरणाच्या मदतीने ऑक्सीजन कॉन्सेंट्रेटरचा ऑक्सीजन अनेक रूग्णांना दिला जाऊ शकतो. बहुतांश कॉन्सेंट्रेटर वीजेवर चालतात. यासाठी याच्या बॅकअपमध्ये ऑक्सीजन सिलेंडर असावा.

ऑक्सीजन प्लांट
ऑक्सीजन प्लांट ऑक्सीजनचा केंद्रीय स्रोत असतो. यासाठी पाईपने ऑक्सीजन थेट रूग्णांपर्यंत पोहचवता येतो. हे प्लांट ऑक्सीजन बनवण्यासाठी क्रायोजेनिक डिस्टिलेशन किंवा प्रेशर स्विंग अब्जॉर्शन (पीएसए) तंत्राचा वापर करतात. ऑक्सीजन कॉन्सेंट्रेटर प्रमाणेच ऑक्सीजन प्लांटसुद्धा वीजेवर अवलंबून असतात. यामध्ये ऑक्सीजन अतिशय वेगवान प्रेशरने निघतो, ज्यामुळे व्हेंटिलेटर सारख्या मशीन्समध्ये ऑक्सीजन सप्लायमध्ये याचा वापर होतो. तर ऑक्सीजन कॉन्सेंट्रेटरने या मशीनमध्ये ऑक्सीजनचा पुरवठा केला जाऊ शकत नाही. ऑक्सीजन प्लांटचा वापर सिलेंडर रिफिल करण्यासाठी सुद्धा केला जातो. ऑक्सीजन प्लांट लावल्यानंतर मेडिकल फॅसिलिटीमध्ये ऑक्सीजनचा पुरवठा सोपा होतो. नंतर ट्रान्सपोर्टेशनची समस्या होत नाही.

लिक्विड ऑक्सीजन टँक
हॉस्पिटलमध्ये ऑक्सजीनचा आणखी एक स्त्रोत लिक्विड ऑक्सीजन टँक स्थापन करणे असतो. या मोठ्या टँकला वेळोवेळी सप्लायरद्वारे भरले जाते. या टँकमधून हेल्थ केयर फॅसिलिटीला सेंटर पाईप सिस्टममध्ये ऑक्सीजन स्पलाय केला जाऊ शकतो. मात्र, हे टँक स्थापन करण्यासाठी मोठी जागा लागते. हे सेल्फ वेपरायजेशन तंत्राचा वापर करतात, ज्यामुळे ते वीजेवर अवलंबून नसतात. या मेडिकल ऑक्सीजन स्त्रोतांशिवाय रुग्णांना ऑक्सीजन देण्यासाठी फ्लो मीटर, रेग्युलेटर, ह्यूमिडिफायर्स आणि व्हेंटिलेटर सारख्या मशीन्सची आवश्यकता असते.