कोणत्या आजाराशी झुंज देत होते CM योगी यांचे वडील ? जाणून घ्या आनंदसिंग बिष्ट यांच्या कुटुंबाबद्दल

नवी दिल्ली – वृत्तसंस्था : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे वडील 89 वर्षीय आनंदसिंग बिष्ट यांनी दिल्लीतील एम्स रुग्णालयात सुमारे 40 दिवस उपचार घेतल्यानंतर आज सकाळी अखेरचा श्वास घेतला. आनंदसिंग बिष्ट यांना मुख्यत: पोटात दुखण्यामुळे पौरी-गढवाल जिल्ह्यातील जॉलीग्रांट येथील हिमालयन रुग्णालयात दाखल केले गेले. त्यांना लिव्हर आणि किडनीसह डिहायड्रेशन, लो बीपी आणि पायात गॅँगरीनचा त्रास होता.

प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना हवाई रुग्णवाहिकेद्वारे दिल्लीला आणण्यात आले. एम्सच्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते आणि डायलिसिसही सुरू होते. रविवारी अचानक त्यांची तब्येत बिघडल्याचे समजते. त्यानंतर त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. सोमवारी सकाळी ते उत्तराखंडमधील पंचूर या गावी जीवन पुरवठा यंत्रणेवर रुग्णवाहिकेद्वारे जाण्याच्या तयारीत होते. त्याची प्रकृती अत्यंत नाजूक होती.

जाणून घेऊया आनंदसिंग बिष्ट यांच्या कुटुंबाबद्दल
आनंदसिंग बिष्ट यांनी वनविभागामध्ये रेंजर म्हणून काम पाहिले. सेवेतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी वाहतूकही हाताळली. सेवानिवृत्तीनंतर ते उत्तराखंडमधील यमेश्वर येथील मूळ गावी पाचूरमध्ये राहत होते. त्यांच्या पश्चात पत्नी सावित्री देवी व चार मुले आणि तीन मुली असा परिवार आहे. मुलांमध्ये सर्वात मोठे मानेंद्र, दुसरे योगी आदित्य नाथ (अजयसिंह बिष्ट), तिसरा मुलगा शैलेंद्र मोहन आणि चौथा महेंद्र. पुष्पा देवी, कौशल्य देवी, शशी देवी अशी मुलींची नावे आहेत. योगी यांचे दोन भाऊ कॉलेजमध्ये काम करतात, तर एक भाऊ आर्मीच्या गढवाल रेजिमेंटमध्ये सुभेदार आहे. वयाच्या 21 व्या वर्षी आदित्यनाथ कुटुंब सोडून गोरखपूरला आले. त्यांचे वडील 24 वर्षांपूर्वी उत्तराखंडमधील एका खेड्यात संन्यासाची दीक्षा घेणाऱ्या आपल्या मुलाला मनविण्यासाठी आले होते, परंतु त्यांना रिकाम्या हाताने परत जावे लागले.

दरम्यान, आनंदसिंग बिष्ट याचा मृतदेह त्यांचे मूळ गाव पंचूर यमकेश्वर येथे आणला जात आहे. त्यांचा छोटा मुलगा महेंद्र बिष्ट आणि अन्य नातेवाईक सोबत आहेत. सोमवारी रात्रीपर्यंत मृतदेह त्यांच्या गावी पोहोचेल. मंगळवारी अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांचा जावई पूरनसिंग पायल यांनी सांगितले की मृतदेहापर्यंत पोहोचल्यानंतरच परस्पर विचारविनिमयानंतर अंत्यसंस्कार करण्याचे ठिकाण निश्चित केले जाईल. संबंधित परिसरातील दिवंगत लोकांचा अंतिम संस्कार थल नदीच्या पारंपारिक घाटात करण्यात आला आहे.

योगी आदित्यनाथ वडिलांच्या अंत्यसंस्कारात सहभागी होऊ शकणार नाहीत
सीएम योगी आदित्यनाथ यांनी वडिलांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करताना कुटुंबीयांना आवाहन केले की, कमीतकमी लोकांनी अंत्यसंस्कारात सहभागी व्हावे. लॉकडाउन संपल्यानंतर मी त्यांना भेटायला येईन. उद्या पौड़ी येथे वडिलांच्या अंत्यविधीला जात नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांना आपल्या वडिलांच्या अंतिम दर्शनाची इच्छा होती, परंतु कोरोनाच्या युद्धामुळे ते तसे करू शकले नाहीत. ‘आदरणीय वडिलांच्या स्मृतींना आदरांजली वाहून मी त्यांना एक विनम्र श्रद्धांजली अर्पण करीत आहे. लॉकडाऊन नंतर मी बघायला येईन.’ असे त्यांनी यावेळी म्हंटले.