सावधान !अशी घ्या Apps व Mobileची काळजी, डेटा चोरीपासून रहा सावध

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – तुम्ही स्मार्टफोनचा वापर करत असाल आणि खूप सारे ऍप मोबाईलमध्ये डाऊनलोड करत असाल तर तुमच्यासाठी ही धोक्याची घंटा असेल. या ऍपच्या माध्यमातून स्मार्टफोनमधील महत्वाची माहिती लीक होऊ शकते. मोबाईलची सुरक्षा देखील धोक्यात येऊ शकते.

अशा परिस्थितीत आपल्याला माहिती पाहिजे की मोबाईलमधील कोणत्या अप्लिकेशनला परवानगी दिली पाहिजे आणि कोणत्या नाही. कोणत्या ऍपला परवानगी द्यायची, कोणत्या ऍपला परवानगी द्यायची नाही. मोबाईलच्या सुरक्षेसाठी मोबाईल सेटिंगमध्ये काय बदल करणे गरजेचे आहे. हे जाणून घेऊ या.

मोबाईलमध्ये डाउनलोड केलेले ऍपला खूप सहजपणे मोबाईलमधील माहिती मिळते. मोबाईलमध्ये घडत असणाऱ्या घडामोडींवरून हे ऍप तुमच्यावर नजर ठेवते. तुम्ही कोठे जाता? काय करता? तुमच्या सवयी कोणत्या आहेत? या सर्वांवर ऍपचे नजर असते.

दोन पद्धतीचे असते परवानगी
अँड्रॉइड फ्रेमवर्कनुसार, सामान्यतः दोन पद्धतीच्या परवानग्या असतात. एक सामान्य परवानगी आणि दुसरी संवेदनक्षम परवानगी. वायफाय, ब्लूटूथ, वॉलपेपर आणि अलार्म यांसाठी वेगळी परवानगी मागितली जात नाही. ही परवानगी ऍपला आपोआप मिळते. याला सामान्य परवानगी म्हटले जाते. कॅमेरा, लोकेशन, माइक्रोफोन, कॉल व एसएमएस लॉग आणि स्टोरेज यांसाठी ऍप्सना युजर्सची परवानगी घ्यावी लागते. सामान्यतः युजर्स अशी परवानगी सहजपणे देतात कारण परवानगीशिवाय असे ऍप डाउनलोड होऊ शकत नाही.

अशी घ्या मोबाईलची काळजी
१. मोबाईल ऍप्स सुरक्षित ठेवण्यासोबत मोबाईल सुरक्षित ठेवणे देखील खूप महत्वाचे आहे. मोबाईलचा पासवर्ड कठीण ठेवा. जन्म तारीख किंवा मोबाईल नंबरचा वापर पासवर्डमध्ये करू नये. पासवर्डमध्ये स्पेशल कॅरेक्टरचा जरूर वापर करा.

२. ईमेल आयडी, फेसबुक किंवा ट्विटर अकाउंटमध्ये ड्यूल सिक्योरिटीचा पर्याय निवडा. यामुळे लॉगइन करताना युजर आयडी आणि पासवर्ड सोबत एका OTP ची देखील गरज भासेल. यामुळे अकाउंट हॅक करणे अजूनच अवघड होऊन जाईल.

३. ईमेल किंवा सोशलमिडीयावर येणारे अनोळखी मेसेज ओपन करू नये. या मेल किंवा लिंकमध्ये व्हायरस असू शकतो.

४. कोणत्याही अनोळखी ऍप्समधून लॉग इन करू नये. सायबर कॅफेत इमेल किंवा सोशलमिडीयाचा वापर करताना प्रायव्हेट ब्राऊजरचा वापर करा.

५. सार्वजनिक वायफायचा वापर टाळा.

६. गरज लागेल तेव्हाच मोबाईलच्या ब्लूटूथचा वापर करा. सतत ब्लूटूथ ऑन ठेवल्याने मोबाईल फोन हॅक होऊ शकतो.

७. कोणत्याही संगणकातून थेट ऍप घेऊ नये. यामुळे देखील मोबाईलमध्ये व्हायरस जाऊ शकतो. ऍप मोबाईलच्या ऍप स्टोअरमधूनच डाउनलोड केले पाहिजे.

आरोग्यविषयक वृत्त –

पावसाळ्यात आलू बुखार आवश्य खा, यात आहेत भरपूर ‘व्हिटामिन्स’

दात पांढरेशुभ्र हवे असतील तर लिंबाचा असा करा उपयोग

वॅक्स करताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी !

‘या’ कारणामुळे फुटतो घोळाणा ; घ्या जाणून

‘नागीण’ या आजारावर ‘हे’ घरगुती उपाय !

‘या’ ५ कारणांमुळे होते ‘किडनी’ खराब, जाणून घ्या

‘मक्याचं’ कणीस खाल्यावर लगेच पाणी पिणे पडेल ‘महागात’

डोकेदुखीने त्रस्त आहात का ? हे घरगुती रामबाण उपाय करा

अपचनाची समस्या अशी दूर करा, हे आहेत प्रभावी ६ घरगुती उपाय