SBI Gold Loan : एसबीआय देशभरात आपल्या ‘गोल्ड लोन लॉकर्स’ची तपासणी का करतंय तपासणी, जाणून घ्या

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   मध्य प्रदेशातील श्योपुरमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) गोल्ड लोन लॉकरमधून सुमारे 15 किलोहून अधिक सोन्याची चोरी केल्याच्या घटनेने बँक मुख्यालयांमध्ये खळबळ उडाली आहे. यापूर्वी एसबीआयच्या कोणत्याही शाखेत अशी रहस्यमय चोरी झाली नव्हती, म्हणूनच एसबीआयने देशभरात पसरलेल्या आपल्या सर्व शाखांच्या सोन्याच्या कर्जाच्या लॉकरच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. सर्व शाखा व्यवस्थापकांना या लॉकरच्या किल्ल्या आणि तारण ठेवलेल्या सोन्याच्या नोंदी जुळवण्यास सूचना देण्यात आल्या आहेत.

श्योपुरमधील एसबीआयच्या स्टेशन रोड शाखेच्या गोल्ड लोन लॉकरमधून 7.33 कोटी रुपये किमतीचे 15 किलो 446 ग्रॅम सोन्याची चोरी झाल्याची माहिती मिळाली आहे. बँकेचे रोख प्रभारी राजीव पालीवाल आणि लेखापाल रामनाथ ठाकूर यांना चोरीच्या संशयावरून निलंबित करण्यात आले आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर एसबीआय मुख्यालयाने सर्व 22 हजार 428 शाखांना ई-मेलद्वारे सूचना पाठविल्या आहेत की, सर्व बँक व्यवस्थापकांनी आपापल्या शाखांमध्ये तयार केलेल्या सोन्याच्या कर्जाच्या लॉकरच्या चाव्या व डुप्लिकेट चाव्या शोधल्या पाहिजेत. लॉकरमधील तारण ठेवलेल्या ग्राहकांच्या सोन्याची पुर्णपणे चौकशी करा. बँक मुख्यालयाने लॉकर तपासण्यासाठी 24 तासांचा कालावधी दिला आहे.

दुसरीकडे कोट्यवधी सोन्याच्या चोरीच्या तक्रारीनंतर दोन दिवसानंतरही श्योपुरच्या एसबीआय शाखेच्या अधिकाऱ्यांना पोलिसांना हे सांगता आले नाही की, ज्या 101 लोकांचे तारण ठेवलेले सोने चोरीला गेले आहे त्यांची नावे काय आहेत आणि प्रत्येक व्यक्तीचे किती सोने होते? श्योपुरचे अप्पर पोलिस अधीक्षक (एएसपी) पीएल कुर्वे म्हणाले की, अशा प्रकरणांमध्ये बँक व्यवस्थापनाने त्वरित पूर्ण नोंदी उपलब्ध करुन द्यायला हवी होती तरी बँकेतून कोणताही जबाबदार अधिकारी चौकशीस मदत करण्यासाठी पोलिस ठाण्यात येत नव्हता.

एसबीआय शिवपुरी रोड मॅनेजर एके जैन म्हणाले की, श्योपुरमधील या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. होय, हे खरे आहे की, बँक मुख्यालयाने देशभरातील शाखांच्या सोन्याच्या कर्जाच्या लॉकरची तपासणी व जुळणी करण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी 24 तासांचा कालावधी देण्यात आला आहे. आम्ही आमचे लॉकर तपासले आहे आणि सर्व काही ठीक आहे.