कुलभूषण जाधव प्रकरणी ‘हे’ १६ न्यायाधीश देणार निकाल, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  – हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानच्या तुरुंगात असलेला भारतीय नौदल अधिकारी कुलभूषण जाधव प्रकरणात आज आंतरराष्ट्रीय न्यायालयात महत्वपूर्ण निकाल दिला जाणार आहे. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी ऍटर्नी जनरलच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानी वकिलाची टीम हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयात पोहचली आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयात कुलभूषण जाधव खटल्यासंबंधीचा निकाल १६ न्यायाधीश देतील. भारतीय प्रमाणवेळेनुसार आज संध्याकाळी साडे सहा वाजता हा निकाल देण्यात येईल. या न्यायाधीशांमध्ये पाकिस्तान आणि भारताचा प्रत्येकी एका न्यायाधीशाचा समावेश आहे. चला या १६ जाणून घेऊ या.

आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे अध्यक्ष अब्दुलकवी अहमद यूसुफ

सोमालियाचे अब्दुलकवी अहमद यूसुफ फेब्रुवारी २०१८ पासून आंतरराष्ट्रीय न्यायलायचे अध्यक्ष आहेत. याआधी ते आयसीजीचे सदस्य होते. युसूफ यांनी याआधी युनेस्कोमध्ये कायदेशीर सल्लागार म्हणून देखील काम केले आहे.

आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे उपाध्यक्ष शू हांकिन

चीनचे शू हांकिन आयसीजीचे २०१० पासून सदस्य आहेत. २०१२ मध्ये त्यांची पुन्हा एकदा निवड करण्यात आली. यानंतर त्यांची फेब्रुवारी २०१८ मध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या उपाध्यक्षपदी निवड झाली.

दलवीर भंडारी

आंतरराष्ट्रीय न्यायालयात दलवीर भंडारी एकमेव भारतीय न्यायाधीश आहेत. या प्रकरणाच्या सुनावणीत देखील त्यांचा समावेश आहे. न्यायाधीश भंडारी २०१२ पासून आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे सदस्य आहेत. २०१८ मध्ये ते पुन्हा सदस्यपदी नियुक्त झाले. भंडारी यांनी सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून देखील काम केले आहे.

तस्सदुक हुसैन जिलानी

पाकिस्तानने न्यायाधीश तस्सदुक यांना जाधव प्रकरणात एड-हॉक जज म्हणून नियुक्ती केली आहे. नियमानुसार, अशाप्रकारे एक देश तेव्हाच करू शकतो. जेव्हा त्या देशाचा कोणताच न्यायाधीश बेंचमध्ये नसतो. तस्सदुक पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश राहिले आहेत.

राहिलेले इतर न्यायाधीश आणि कंसात त्यांचे देश पुढीलप्रमाणे : –

जज एंटोनियो ऑगस्टो ट्रिनडाडे (ब्राजील), जज रॉनी अब्राहम ( फ्रान्स), जज जोआन ई. डोनोह्यू (अमेरिका), जज जॉर्जिओ गजा (इटली), जज पैट्रिक लिप्टन रॉबिंसन (जमैका), जज जेम्ल रिचर्ड क्रॉफोर्ड (ऑस्‍ट्रेलिया), जज जूलिया सेबुटिंडे (यूगांडा), जज किरिल गेवोर्जिअन (रशिया), जज नवाज सलाम (लेबनॉन), जज यूजी इवसावा ( जपान) , जज पीटर टॉमका (स्‍लोवाकिया), जज मोहम्मद बेनौना (मोरक्को).

महिलांनी ‘फिट अ‍ॅन्ड फाईन’ राहण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो कराव्यात

२० आजारांवरील ‘हे’ आहेत रामबाण घरगुती उपाय, आवर्जून लक्षात ठेवा

तजेलदार त्वचेसाठी ‘चालता-फिरता’ करा ‘हे’ १० ‘छोटे-छोटे’ उपाय !

‘या’ ७ गोष्टींचे सेवन केल्यास डोके आणि शरीर होईल शांत

मेडिटेशन करताना ‘घ्या’ या गोष्टींची काळजी

मासिक पाळीदरम्यान आपल्या त्वचेची ‘अशी’ घ्या काळजी