भारतीय हॉकीपटू आणि व्हॉलिबॉल पटूचा गोळ्या झाडून निर्घृण खून, क्रिडा क्षेत्रात खळबळ

पटियाला : वृत्तसंस्था – भारतीय हॉकीपटू आणि व्हॉलीबॉल खेळाडूंचा गोळ्या झाडून खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे क्रिडा क्षेत्रात खळबळ उडाली आहे. ही घटना पंजाबच्या पटियाला येथे घडली आहे. अमरिक सिंह (Amrik Singh) आणि त्याचा सहकारी व्हॉलीबॉलपटू सिमरजित सिंह (Simranjit Singh) असे खून करण्यात आलेल्या खेळाडूंची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री उशिरा पटियालाच्या 24 नंबर गेटजवळ अमरिक सिंह आणि सिमरिजत सिंह हे उभे होते. त्यावेळी त्याठीकाणी काही लोकांसोबत त्यांचे वाद झाले. याच वादातून त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. हा प्रकार रात्री एकच्या सुमारास घडला असल्याची प्राथमिक माहिती आहे.

राष्ट्रीय हॉकीपटू अमरिक सिंह आणि त्याचा सहकारी व्हॉलीबॉल पटू सिमरजित सिंह यांच्यावर हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या. दोघांच्या डोक्यात गोळ्या लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

You might also like