Pimpri : ‘आमच्या संघाकडून कबड्डी खेळ’, राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूला तलवार अन् कोयत्याने मारहाण

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – आमच्या संघाकडून कबड्डी ( Kabaddi ) खेळ, असे म्हणत एका राष्ट्रीय स्तरावरील कबड्डी (Kabaddi) पटूला (National level player) तलावर आणि कोयत्याने मारहाण केली. ही घटना चिखली पोलीस ठाण्याच्या (Chikhali Police Station) हद्दीत घडली आहे. या घटनेत कबड्डीपटू गंभीर जखमी झाला आहे. ही घटना चिखली गावातील कमानीजवळ गुरुवारी घडली. याप्रकरणी 5 जणांवर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. आरोपी हा कबड्डीपटूचा भाचा (Nephew) आहे.

संतोष बाळासाहेब मोरे (वय-34 रा. चिखली गाव) असे गंभीर जखमी झालेल्या खेळाडूचे नाव आहे. याप्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात शुक्रवारी (दि.4) संतोष मोरे यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरुन राहुल यादव (रा.कुदळवाडी, चिखली), सोन्या नेवाळे, गौरव गावडे (दोघे रा. चिखली), दोन अनोळखे इसम (नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी फिर्यादीचा भाचा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संतोष मोरे हे कबड्डीपटू आहेत.
राष्ट्रीय स्तरावरील कबड्डी स्पर्धांमध्ये ते सहभागी झाले आहेत.
आरोपी राहुल यादव हा फिर्यादी संतोष मोरे यांचा भाचा आहे.
गुरुवारी संतोष मोरे हे मित्रांसोबत गप्पा मारत बसले होते.
त्यावेळी भाचा राहुल व त्याच्या मित्रांनी बेकायदा जमाव केला.

कबड्डी खेळण्यास लायक ठेवणार नाही

आरोपींनी फिर्यादी यांना तू ब्रह्मा-विष्णू-महेश संघाकडून कबड्डी खेळू नको. तू आमच्या ओम साई कबड्डी संघाकडून खेळ, नाही तर मी तुला कबड्डी खेळण्याच्या लायक सोडणार नाही, असे आरोपी यादवने मोरे यांना धमकावले. यानंतर त्याने हातातील तलवार मोरे यांच्या मांडीवर मारुन जखमी केले. दगडाने डाव्या पायाच्या नडगीवर मारहाण करुन खाली पाडले. त्यानंतर उजव्याच्या नडगीवर कोयत्याने मारुन गंभीर जखमी केले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन देशमुख करित आहेत.

ऑनलाइन एफडीबाबत SBI ने दिला इशारा ! सांगितले कशा प्रकारे सुरू आहे फसवणूक आणि कसा करावा बचाव, जाणून घ्या