Lockdown Extension: बहुतेक राज्यांना लॉकडाऊन वाढवायचाय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शुक्रवारी गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. या बैठकीत गृहमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींना मुख्यमंत्र्यांची मतं व सूचनांविषयी माहिती दिली. एक किंवा दोन दिवसांत लॉकडाऊनच्या पुढील टप्प्याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे. अमित शहा यांनी मागच्या गुरुवारी देशातील मुख्यमंत्र्यांशी फोनवर संवाद साधला होता, कारण राज्यांतील चिंतीत भाग आणि त्या क्षेत्रांबद्दल जाणून घ्यायचे होते, जे क्षेत्र त्यांना १ जूनपासून उघडायचे आहेत.

राज्यांना स्थानिक पातळीवर सवलत हवी आहे
विशेष म्हणजे आतापर्यंत प्रत्येक लॉकडाऊन वाढवण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशातील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्र्यांशी वैयक्तिकरित्या बोलण्याची ही पहिलीच वेळ होती. गृहमंत्रालयाच्या सूत्रांचे म्हणणे आहे की, अधिकतर मुख्यमंत्र्यांना लॉकडाऊन पुढे वाढवण्याची इच्छा आहे, परंतु राज्यांना सूट संबंधी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यासाठी अधिक स्वायत्तता हवी आहे. मात्र सीएम यावर सहमत होते की, केंद्र एक सर्वसमावेशक धोरणांची चौकट तयार करू शकते. केंद्र सरकार येत्या दोन दिवसांत निकाल जाहीर करेल अशी अपेक्षा आहे, कारण असे संकेत दिले गेले आहे कि लॉकडाऊन १५ जूनपर्यंत वाढवले जाईल, परंतु बरीच सवलत मिळाल्यानंतर.

१३ शहरांमध्ये बिकट परिस्थिती
यासंदर्भात एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की, पुढच्या टप्प्यात केंद्र सरकार आपली भूमिका मर्यादित ठेवून सवलत देण्यास किंवा कठोर करण्याचे काम राज्यांकडे सोपवण्याचा विचार करत आहे. मात्र महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात, दिल्ली, मध्य प्रदेश, बंगाल, राजस्थान, उत्तर प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेश, पंजाब आणि ओडिसामधील कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित असलेल्या ३० शहरी भागासाठी केंद्र राज्यांना पूर्वीचे निर्बंध कायम ठेवण्याचा सल्ला देईल.

देशात कोरोनाची ८० टक्के प्रकरणे याच शहरी भागात आहेत. या ३० शहरी भागातील दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईसह १३ शहरांची परिस्थिती आणखी बिकट आहे. या शहरांचे डीएम आणि शहर प्रशासकांसह कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी ऑनलाईन बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे. दरम्यान, एका वृत्तवाहिनीशी बोलताना केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले की, लॉकडाउन ५.० अगदी सामान्य असेल. केवळ काही क्षेत्रातच निर्बंध असतील. बाकी ठिकाणे उघडली जातील. ते म्हणाले की, ही वेळ सदैव अशीच असेल. लोकांना मोठ्या प्रमाणात सूट देण्यात आली आहे आणि आता सामान्य जीवनाची अपेक्षा आहे.