Lockdown : धक्कादायक ! दारू मिळत नसल्यानं 2 युवकांची आत्महत्या

केरळ : वृत्तसंस्था –  भारतातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत असून आतापर्यंत 25 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाग्रस्तांची सख्या ही 900 च्या पुढे गेली आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात 21 दिवसांचा लॉकडाऊनची घोषणा केली आहे. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने लोकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. याच दरम्यान जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरु ठेवण्यात आली आहेत. मात्र इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे देशातील तळीरामांची चांगलीच अडचण झाली आहे.

दारुची दुकानं बंद असल्यामुळे दोघांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. केरळच्या वेगेवगळ्या ठिकाणी या घटना घडल्या असून केवळ दारू मिळत नसल्याच्या नैराश्येतून त्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्रिशूर जिल्ह्यातील कोडुंगलूर येथील सुरेश (वय-32) याने नदीत उडी मारून आत्महत्या केली तर नौफाल (वय-34) याने अफ्टर शेव लोशन पिऊन आत्महत्या केली.

सुनेश हा दारू मिळत नसल्याने निराश होता आणि त्याची दारू सुटण्याची लक्षण त्यामध्ये दिसून येत होती. तक्रारीत म्हटले आहे की, तो रात्री उशीरा घरातून बाहेर पडला आणि नदीवर जाऊन नदीच्या पाण्यात उडी घेतली. तपास अधिकाऱ्यांनी त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला आहे. तर नौफल याला दारू मिळत नसल्याने तो तळमळत होता. त्याने अफ्टर शेव लोशन पिल्याने त्याला अल्लाप्पुझा जिल्ह्यातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याच्या नातेवाईकांनी सांगितले की, एक वर्षापूर्वी तो परदेशातून आल्यानंतर त्याला दारू पिण्याचे व्यसन लागले. वल्लिकुन्नाम पोलिसांनी सांगितले की, दारू न मिळाल्याने त्याने अफ्टर शेव लोशन पिले. यापूर्वी एका 38 वर्षीय कामगाराने दारू न मिळाल्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

राज्य सरकारने यापूर्वीच सूचित केले होते की, ज्या लोकांना दारू न मिळाल्याने त्रास होतो त्यांनी जिल्ह्यातील नशामुक्ती केंद्रात दाखल व्हावे. राज्याच्या नशामुक्ती कार्यक्रमाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी. राजीव यांनी दारू सोडवण्यासाठी येणाऱ्या रुग्णांसाठी आम्ही केरळ,पंतप्रधान नरेंद्र मोदी,लॉकडाऊन,केंद्र सरकार,राज्य सरकार,व्यसनमुक्ती केंद्र,मध्ये टेलिकाऊन्सिलिंगची सोय केली आहे. शनिवारी किमान 100 लोक गंभीर अवस्थेत आमच्या केंद्रावर आली होती. या सर्वांना त्वरित वैद्यकीय मदतीची गरज होती. गरज पडल्यास आम्ही खासगी डॉक्टरांची देखील मदत घेतली जात आहे, असे त्यांनी सांगितले.