राष्ट्रीय लोकदल पक्षाचे प्रमुख चौधरी अजीतसिंह अद्यापही समाजवादी पक्षाबरोबरच

लखनऊ : वृत्तसंस्था – ऊत्तर प्रदेशात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मायावती यांच्या बहुजन समाजवादी पार्टी आणि अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टी यांनी आघाडी करत निवडणूक लढवली होती. मात्र लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर काल दिल्लीत पार पडलेल्या चिंतन बैठकीत मायावती यांनी उत्तर प्रदेशात ११ ठिकाणी होणाऱ्या विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केली होती.

या महाआघाडीतील तिसरा घटक पक्ष राष्ट्रीय लोकदल पक्ष देखील यातून बाहेर पडण्याचा विचार करत असल्ल्याची माहिती समोर येत होती मात्र आज याबाबत राष्ट्रीय लोकदल पक्षाचे प्रमुख चौधरी अजीत सिंह यांनी आम्ही समाजवादी पक्षाबरोबर असल्याचे सांगितले आहे.

याबाबत बोलताना आरएलडीचे प्रवक्ते अनिल दुबे यांनी याबाबत बोलताना सांगितले कि, मायावती यांनी जरी साथ सोडली असली तरी आम्ही अजूनही महाआघाडीत आहोत. त्याचबरोबर पोटनिवडणुका देखील आम्ही एकत्रच लढवणार आहोत.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मायावती आणि अखिलेश यांनी भाजपला टक्कर देण्यासाठी महायुती केली होती. त्याचबरोबर आरएलडी देखील त्यांच्यासोबत युतीमध्ये होती. त्यावेळी बसपाने ३८, सपा ३७ आणि आरएलडीने ३ जागा लढविल्या होत्या.

अमेठी आणि रायबरेलीची जागा त्यांनी काँग्रेससाठी सोडली होती. मात्र दोघे एकत्र येऊन देखील भाजपला उत्तर प्रदेशात हरवू शकले नाही. ८० जागांपैकी बसपला केवळ १० जागा मिळाल्या. तर समाजवादीला ५ जागांवर समाधान मानावे लागले. तर एनडीएने ६४ जागांवर विजय मिळवला होता. त्यामुळे आता या गोष्टींचा काहीच फायदा नसल्याने प्रत्येक पक्ष स्वबळावर लढण्याची तयारी करत आहे.

दरम्यान, याअगोदर मायावती यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण उत्तर प्रदेशात होणाऱ्या विधानसभेच्या पोटनिवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केली होती.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like